शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मेट्रोला जोडणार ‘पॉड टॅक्सी’ने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 09:15 IST

‘ठामपा’च्या माध्यमातून ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील कामांचा आढावा सरनाईक यांनी घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अंतर्गत आणि मुख्य मेट्रोला जोडण्यासाठी घोडबंदर भागात ‘पॉड टॅक्सी’ची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शुक्रवारी ठाणे पालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात यासंदर्भातील प्रकल्पाचे सादरीकरण परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. मीरा-भाईंदर पालिका हद्दीतही हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याबरोबर वेळेची बचतही होणार असल्याचा दावा सरनाईक यांनी केला.

‘ठामपा’च्या माध्यमातून ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील कामांचा आढावा सरनाईक यांनी घेतला. यावेळी ‘पॉड टॅक्सी’चे सादरीकरण करण्यात आले. मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोचे शेवटचे स्टेशन हे घोडबंदर भागात येणार आहे; परंतु तेथपर्यंत पोहोचण्यासाठी पॉड टॅक्सीचा पर्याय पुढे आला आहे. ‘रोप-वे’प्रमाणे ही टॅक्सी चालवली जाणार आहे. पावसाळ्यात या भागात पाणी साचून होणाऱ्या कोंडीतून यामुळे सुटका होणार आहे. ही टॅक्सी हवेत तरंगत चालणार आहे. तिचा ताशी ६० ते ७० किमी एवढा वेग असणार आहे. यातून १६ प्रवासी जाऊ शकतात. 

‘रोप-वे’ किंवा ‘पॉड टॅक्सी’ एमएमआर क्षेत्रातही आता सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्या ठिकाणी ‘रोप-वे’ शक्य असेल तेथे ‘रोप-वे’ आणि ज्या ठिकाणी ‘पॉड टॅक्सी’ शक्य असेल तेथे ती सेवा देण्यास प्राधान्य दिले जाईल. यासंदर्भातील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही झाला आहे. त्यानुसार आता सर्वेक्षण करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

या ठिकाणी धावणार ‘पॉड टॅक्सी’ भाईंदर पाडा ते विहंग हिल या एक किमीच्या ४० मीटर रस्त्याच्या वरच्या भागातून ही टॅक्सी धावणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही हवाई वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. यासाठी पालिका किंवा राज्य सरकारचा एकही रुपया खर्च होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मीरा-भाईंदर पालिका हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जीपी येथील ६० मीटर रस्त्यावरही चालविली जाणार आहे. इलेक्ट्रिकवर टॅक्सी धावणार आहे. यासाठी सिमेंटचे गर्डर असून, याचे व्हील आणि ट्रॅक हे स्टीलचे असतील, अशी माहिती संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईक