शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

ठाण्यात प्लायवूड आणि केकच्या दुकानाच्या आगीमध्ये लाखोंचे नुकसान 

By जितेंद्र कालेकर | Updated: May 5, 2023 19:17 IST

घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील प्लायवूड आणि केक शॉप या बाजूबाजूच्या दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

ठाणे : घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील प्लायवूड आणि केक शॉप या बाजूबाजूच्या दुकानांना आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. सुमारे दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रण आली. मात्र, आगीमध्ये दोन्ही दुकाने जळून खाक झाली. या आगीने क्षणात रौद्र धारण केल्याने धुराचे लोळ मोठया प्रमाणात पसरले होते. वेहीच आग नियंत्रणात आल्यामुळे दुकानाच्या शेजारी असलेल्या एका खासगी रुग्णालयामधील रुग्णांना तिथून हलविले नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या दरम्यान, खबरदारी म्हणून रुग्णांना रुग्णालयातुन खाली आणले होते. त्यामुळे त्यांचे हाल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

घोडबंदर रोडवरील मानपाडा ब्रीजजवळील साई किरण रेस्टॉरंट आणि बार समोरील जिनेश जैन यांच्या ला प्लायवूड शॉप तसेच मिलिंद चौहान यांच्या सूफले केक शॉपच्या दुकानांना आग लागून भीषण स्वरूप धारण केल्याची माहिती मिळाल्यानंतर कापूरबावडी अग्निशमन दलासह ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच चितळसर पोलिस ठाण्याचे पथक, महावितरण विभागांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी कापूरबावडी अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी दोन फायर, दोन वॉटर टँकर, दोन जंबो वॉटर टँकर आणि एका टी.टी.एल. मशीनची मदत घेण्यात आली. ही दुकाने बाजूबाजूला असून मुख्य रस्त्याच्या सर्व्हिस रोडला असल्याने याचा परिणाम वाहतुकीवरही झाला होता. आग पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी करून ती मोबाईलमध्ये कैद करताना बरीच मंडळी आघाडीवर होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून दोन्ही दुकानांचे मात्र मोठया प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. कचराही पेटलामानपाडा, निळकंठ वूड या ठिकाणी कचºयाला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास लागली. घटनास्थळी कचºयाला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने नियंत्रणात आणली. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. 

टॅग्स :thaneठाणे