शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात पालेभाज्यांचे दर निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:51 IST

दहा दिवसांपूर्वी द्विशतक गाठलेल्या कोथिंबिरीचे दर आता शंभरीच्या आत आले आहेत.

ठाणे : दहा दिवसांपूर्वी द्विशतक गाठलेल्या कोथिंबिरीचे दर आता शंभरीच्या आत आले आहेत. लातूर, बेळगाव, पुणे याठिकाणाहून कोथिंबिरीची आवक सुरू झाल्याने सध्या नाशिकच्या कोथिंबिरीकडे विक्रेत्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे सध्या किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपयांनी कोथिंबीर विकलीजात असून इतर पालेभाल्यांचे दर निम्म्यावर आल्याचे भाजीविक्रेत्यांनी सांगितले.ठाण्याच्या बाजारात कोथिंबीर २५० रुपये जुडीने मिळत असल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. परंतु लातूर, बेळगाव, पुणे या ठिकाणाहून येणारी कोथिंबीर ही स्वस्त असून लातूर आणि पुण्याची कोथिंबीर ४० ते ५० रुपये जुडी, तर बेळगावहून येणाऱ्या कोथिंबिरीचे दर ४० रुपये असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तसेच, पावसामुळे वाहतुकीतच भाज्या सडत असल्याने इतर पालेभाज्यांचे दरही दुप्पट झाले होते. परंतु, कमी झालेल्या पावसामुळे भाज्या सडत नसल्याने या भाज्यांचे दर आता गडगडले असल्याचे भाजीविक्रेते निवृत्ती क्षीरसागर यांनी लोकमतला सांगितले. भाव कमी झाल्याने ठाणेकर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे ते म्हणाले.>पालेभाज्यांची नावे आधीचे दर आताचे दरकोथिंबीर २०० ते २५० रु. जुडी ४० ते ५० रु.मेथी ४० रु. जुडी २० ते २५ रु.पालक १५ ते २० रु. जुडी १० रु.चवळी २० रु. जुडी १५ रु.कांदापात (पुणे) ४० रु. जुडी १५ ते २० रु.कांदापात (नाशिक) ५० ते ६० रु. जुडी ४० ते ५० रु.शेपू (नाशिक) ५० रु. जुडी ४० रु.शेपू (पुणे) ३० रु. जुडी १५ ते २० रु.लालमाठ २० रु. जुडी १५ ते २० रु..नाशिकहून येणारी कोथिंंिबरीची जुडी महाग असल्याने ती विक्रेते आणि ग्राहकांना परवडत नाही, त्यामुळे सध्या नाशिकची जुडी विक्रीला आणत नसल्याचे ते म्हणाले. पालेभाज्या महाग झाल्याने चवळीची भाजी मिळेनाशी झाली होती. परंतु, आता या भाजीचीही आवक होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.