शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात प्लास्टिक रिसायकलिंग मशीन; रेल्वेस्थानक होणार नो प्लास्टिक झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 22:43 IST

ठाणे रेल्वे स्थानकातून मध्य आणि हार्बर (वाशी-पनवेल) लोकल, तसेच एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांचा खच होत असताना दुसरीकडे त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी रेल्वे प्रशासनांकडे कोणतीही यंत्रणा नव्हती. मात्र, आता येथे अत्याधुनिक पेट बॉटल रिसायकल मशीन बसवण्यात आली आहे. त्यामुळे या मशीनमध्ये प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या टाकताच काही क्षणात रिसायकलिंग होऊन त्यांची विल्हेवाट लागेल. ही मशीन सद्यस्थितीत स्थानकातील फलाट क्रमांक २ येथे बसवण्यात आली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातून मध्य आणि हार्बर (वाशी-पनवेल) लोकल, तसेच एक्स्प्रेस व मालगाड्या धावतात. दररोज ठाण्यातून ७८२ अपडाउन लोकलसह ठाणे-वाशी-पनवेलवर २८२ अप-डाउन तसेच ८० अप आणि ७० डाउन अशा एक्स्प्रेस धावतात. तसेच ठाण्यातून नियमित ३.५० लाख लोकल प्रवासी तिकिटांची विक्री होत आहे. या प्रवासी संख्येसह पासधारक आणि एक्स्प्रेसने प्रवास क रणारे असे दिवसभरात ठाण्यातून जवळपास सात ते आठ लाख प्रवासी ये जा करतात. स्थानकात १० फलाटांवर एकूण १६ उपाहारगृहे आहेत. याच उपाहारगृहांतून उन्हाळा सुरू झाल्याने आणि लिंबू सरबत मिळणे बंद झाल्याने दररोज एक लीटरच्या १२ बाटल्या असलेले ५०० बॉक्स म्हणजे ६००० लीटर पाणी दिवसाला विक्री होते. एका महिन्याचा विचार केल्यास सुमारे दोन लाखांच्या आसपास लीटर पाणी विक्री होते.मात्र, उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळा आणि हिवाळ्यात हे प्रमाण निम्मे असते,असे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात येते. फलाट क्रमांक ७ वरून मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांमधून रिकाम्या बाटल्या जास्त प्रमाणात फलाट आणि रेल्वे रुळांवर फेकल्या जातात. त्या कचऱ्यांमध्ये जमा होतात. या बाटल्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच मार्श अ‍ॅण्ड मॅकलिन कंपनीचे ही मशीन रोटरी क्लबच्या पुढाकाराने बसवण्यात आली आहे. ती कशी हाताळायची याबाबत सूचनादेखील प्रवाशांना दिल्या जातात. प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर यानिमित्ताने होणार आहे.या मशीनची क्षमता १५ किलो एवढी असून संबंधित कंपनीचे कर्मचारी हे प्लास्टिक कंपनीमध्ये पुढील प्रक्रियेसाठी घेऊन जाणार आहेत. या मशीनचा जास्तीत जास्त प्रवाशांनी वापर करावा, असे आवाहन फलाटांवर फलक लावून केले जाणार आहे. तसेच ठाणे स्थानक नो-प्लॉस्टिक झोन करण्याचा निर्धार यानिमित्त केला जाणार असल्याचा ठाणे रेल्वे प्रबंधक आर.के. मीना यांनी केला.

टॅग्स :railwayरेल्वेPlastic banप्लॅस्टिक बंदी