शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘नॅब’ मध्ये प्लास्टिक प्रक्रिया उद्योग होणार सुरु, दृष्टिहीनांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 02:15 IST

औद्योगिक वसाहतीमधील प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न सुटून उद्योगांना प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी कच्चा माल मिळणार आहे.

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये असलेल्या ‘नॅब’ संस्थेमध्ये स्थानिक उद्योजकांची संघटना असलेल्या ‘आमा’ च्या सहकार्याने प्लास्टिक प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येणार आहे. त्याद्वारे अंध बांधवांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. औद्योगिक वसाहतीमधील प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न सुटून उद्योगांना प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी कच्चा माल मिळणार आहे.१९८५ मध्ये राज्य सरकारने अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीमध्ये अंध बांधवांना अभियांत्रिकी उद्योगात आवश्यक असणारी कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘नॅब’च्या सहकार्याने पॉलिटेक्निक सुरू करण्यात आले. या केंद्रात राज्यातील ४० अंध बांधवांच्या निवासी प्रशिक्षणाची सोय आह. आनंदनगर औद्योगिक वसाहतीमध्ये लहान-मोठे एक हजारांहून अधिक कारखाने आहेत. तिथून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचºयात टाकले जाते. या प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणारा प्रकल्प नॅब पॉलिटेक्निकच्या सहकार्याने ‘आमा’ संघटना राबविणार आहे. प्लास्टिकच्या पुनर्वापरामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनास हातभार लागेल, अंध बांधवांना रोजगार मिळेल त्याचबरोबर शहरातील उद्योजकांना प्लास्टिकचा कच्चा माल लागतो तो याच प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याचा विश्वास ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष आणि नॅब पॉलिटेक्निकचे स्थानिक कमिटीचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी व्यक्त केला. ‘नॅब’च्या आवारात अंध प्रशिक्षणार्थी बनवत असलेल्या विविध वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन आणि विक्री केंद्रही उभारण्यात येणार असल्याचे तायडे यांनी सांगितले.