शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक, ई-कचऱ्यावर प्रक्रिया, घरी येऊन, पैसे मोजून घेऊन जाणार टाकाऊ पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 06:32 IST

मुंबई आणि उपनगरांतील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारलेले नाहीत. मुंबई परिसरातूनच वर्षाला दोन लाख टन ई-कचरा गोळा होतो. त्यातच, सरकारने प्लास्टिकबंदी लागू केली आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : मुंबई आणि उपनगरांतील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारलेले नाहीत. मुंबई परिसरातूनच वर्षाला दोन लाख टन ई-कचरा गोळा होतो. त्यातच, सरकारने प्लास्टिकबंदी लागू केली आहे. मात्र प्लास्टिक, पेपर आणि ई-कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणाºया महाराष्ट्रात केवळ तीनच कंपन्या असून त्यापैकी ‘एव्हरग्रीन रिसायकल करो’ या कंपनीने सामान्य नागरिकांसाठी अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारे कंपनीशी संपर्क साधल्यास कंपनीचे कामगार घरी येऊन ई-कचरा, पेपर आणि प्लास्टिक कचरा घेऊन जातील व त्याचा योग्य दामही किलोच्या हिशेबाने दिला जाणार आहे.एव्हरग्रीन रिसायकल करो ही कंपनी २०१० पासून कार्यरत आहे. कंपनीचे कार्यालय ऐरोली येथे, तर कचरा प्रक्रिया केंद्र वाडा येथे आहे. या कंपनीला कचरा रिसायकलिंग करण्याची परवानगी केंद्रीय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेली आहे. वाडा येथील कचरा प्रक्रिया केंद्रात वर्षाला २४०० मे.ट. कचºयावर प्रक्रिया केली जाते. कंपनीचे अभियंता रूपेश चित्ते यांनी सांगितले की, आम्ही केवळ बड्या कंपन्यांमधून तयार होणाºया ई-कचºयावर प्रक्रिया करत होतो. मात्र, आता सर्वसामान्यांच्या घरातील ई-कचºयावर प्रक्रिया करण्याकरिता तो गोळा केला जाणार आहे. काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन गोळा केलेले प्लास्टिक आणि पेपर कंपनीकडे दिले. एखादी संस्था हजारो किलो प्लास्टिक, पेपर आणि ई-कचरा गोळा करून देणार असेल, तर तो कचरा कंपनी विकत घेईल.सामान्य नागरिकांच्या घरातील ई-कचरा आरोग्याला घातक असतो. प्लास्टिक फेकून दिल्याने पर्यावरणाची हानी होते. सामान्यांच्या घरातील ई-कचºयावर प्रक्रिया करण्याबाबत कंपनीने तयार केलेले अ‍ॅप महिनाभरात सुरू होईल. अ‍ॅप्सद्वारे संपर्क साधल्यावर कंपनीचे प्रतिनिधी घरी जाऊन कचरा घेतील. त्या बदल्यात किलोच्या हिशेबाने रोख पैसे दिले जातील. हे अ‍ॅप मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई याठिकाणीही लागू असेल.एव्हरग्रीनप्रमाणे महाराष्ट्रात ई-वेस्ट रिसायकलिंग इंडिया व इकोरेको या अन्य दोन कंपन्या रिसायकलिंगचे काम करतात. राज्य सरकारने प्लास्टिकबंदी लागू केल्यानंतर राज्यात केवळ तीनच कंपन्या रिसायकलिंग करत आहेत, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. अन्य कंपन्यांनाही रिसायकलिंगची परवानगी द्यायला हवी. सर्व प्रकारच्या कचºयाची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणे, या २००० सालच्या नियमावलीची अंमलबजावणी अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी अद्याप केलेली नाही. सुधारित नियमावली २०१६ साली झाल्यामुळे अनेक महापालिका, नगरपालिका अडचणीत आलेल्या आहे. कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया न केल्यास महापालिका व नगरपालिकांचे अनुदान रोखण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अनेक शहरांत प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतरही पिशव्यांचा वापर सर्रास सुरू आहे. त्यामुळे ही बंदी केवळ कागदावरच आहे....तर डम्पिंगची समस्या सुटेलनागरिक, महापालिका, सामाजिक संस्थांनी प्लास्टिक, पेपर आणि ई-कचरा कुठेही टाकून न देता कंपन्यांकडे दिल्यास त्यातून त्यांना पैसा मिळेल. पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल. उरलेला कचरा केवळ ओला कचरा असेल. त्यावर वेस्ट टू कंपोस्ट करता येऊ शकते. या प्रयत्नातून डम्पिंगची समस्या सुटण्यास मदत होऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका