शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

‘समता’तर्फे प्लाझ्मा, कोरोना औषधांची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 00:18 IST

५५ जणांना मिळवून दिला प्लाझ्मा

ठाणे : ठाणे शहरातील प्लाझ्मा, बेड आणि रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना समता विचार प्रसारक संस्थेने पुढाकार घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांना मदतीचा हात पुढे केला. त्यांना प्लाझ्मा, काेराेनाची औषधे उपलब्ध करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत केली. संस्थेतर्फे ५५ रुग्णांना प्लाझ्मा, १९ रुग्णांना बेड, पाच जणांना रक्तपुरवठा, तीन रुग्णांना ऑक्सिजन, १८ रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात यश आले आहे.

ठाण्यात एखादा रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल केला की डॉक्टर उपचार केल्यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांना सांगून रुग्णाला लागणारे प्लाझ्मा, रेमडेसिविर इंजेक्शन, टाॅसिलिझुमॅब इंजेक्शन, रक्त, ऑक्सिजन अशा अनेक आवश्यक साहित्याची जुळवाजुळव करण्यास सांगतात. नातेवाइकांसाठी याची व्यवस्था करणे खूप कठीण जात असल्यामुळे संस्था महिनाभरापासून त्यांना मदत करत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी तत्काळ मदत मिळावी यासाठी संस्थेतर्फे सहखजिनदार आणि जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे ठाणे शहर समन्वयक अजय भोसले यांच्या संयोजनाखाली हे काम सुरू आहे. सध्या प्लाझ्माचा तुटवडा व रक्तपुरवठा पेढीवरील ताण बघता संस्थेतर्फे ताे कमी करण्यावर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना प्लाझ्मादान करण्यासाठी आवाहन करत आहाेत. प्लाझ्मा मागण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांची संख्या माेठी आहे. अनेकदा त्यांनाच प्लाझ्मादाता शाेधावा लागताे. प्लाझ्मादान करणाऱ्या नागरिकांची अँटिबॉडीज आणि एचबी व अन्य चाचण्या रक्तपेढ्यांत केल्या जातात, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा मनीषा जोशी यांनी दिली. 

जास्तीतजास्त प्लाझ्मादात्यांनी पुढे यावेकाही जणांना मदत करता न आल्यामुळे प्राण गमवावे लागले. त्यामुळे जास्तीतजास्त प्लाझ्मादात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. सर्व कोरोनामुक्त रुग्णांनी सामाजिक जबाबदारी व कर्तव्य समजून प्लाझ्मादान करून रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत करावी, असे आवाहन संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या