शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

पु. ल., व. पुं.ची पुस्तके छापली नाहीत, म्हणून माझे नुकसान झाले नाही; साहित्य पुरस्कार साेहळ्यात रामदास भटकळ यांची सडेतोड मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 11:56 IST

प्रसिद्ध कवी-अभिनेता किशोर कदम यांनी भटकळ यांना विविध मुद्यांवर बोलते केले. ग्रंथतपस्वी असलेल्या भटकळ यांच्या आजवरच्या साहित्यिक जीवनप्रवासाचा पट रसिकांसमोर उलगडत गेला.

ठाणे : विश्राम बेडेकर, मामा वरेरकर, दुर्गा भागवत, धर्मकीर्ती सुमंत यासारख्या मोठ्या लेखकांचे लेखन मला जसे आवडले, तसे मला पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे यांचे लेखन आवडले नसेल. सगळे चांगले ते मीच प्रकाशित केले पाहिजे, असा माझा कधी आग्रह नव्हता. त्यांची पुस्तके छापली नाहीत म्हणून माझे काही फार नुकसानही झाले नाही, असे सांगत ज्येष्ठ प्रकाशक, लेखक, विचारवंत रामदास भटकळ यांनी पु. लं. आणि व. पु. यांची पुस्तके न छापण्यामागचे कारण विषद केले. निमित्त होते ‘लोकमत’ साहित्य पुरस्कार सोहळ्यात आयोजित त्यांच्या प्रकट मुलाखतीचे. प्रसिद्ध कवी-अभिनेता किशोर कदम यांनी भटकळ यांना विविध मुद्यांवर बोलते केले. ग्रंथतपस्वी असलेल्या भटकळ यांच्या आजवरच्या साहित्यिक जीवनप्रवासाचा पट रसिकांसमोर उलगडत गेला.

नेमाडेंपासून ग्रेसपर्यंत मोठमोठ्या लेखकांची पुस्तके तुम्ही छापलीत, पण पु. ल., व. पु. यांची पुस्तके का छापावीशी वाटली नाहीत? असा प्रश्न किशोर कदम यांनी करताच, भटकळ उत्तरले, ‘सगळे चांगले ते मीच केले पाहिजे, असा माझा कधीच आग्रह नव्हता. पु. लं.शी एक-दोनदा संबंध आला, मात्र पुढे काही कारणांनी त्यांनी त्यांची पुस्तके आम्हाला दिली नाहीत, परंतु मला कुणाबद्दल तसे काही बोलायचे नाही. अर्थात, त्यामुळे माझे काही फार नुकसान झाले नाही. प्रकाशकाने एका लेखकाची सगळी पुस्तके केली पाहिजेत, पण तसे ते अशक्य असते. तरीही कमी लिहिणाऱ्यांची पुस्तके एकाच प्रकाशकाने करावीत,’ असे माझे मत आहे.

‘ग्रंथाली’शी खोटं बोललो, किशोर कदम यांची कबुलीकिशोरच्या कविता जेव्हा ऐकल्या, तेव्हा मी धुंदीत गेलो. तेव्हा मी निवृत्त झालो होतो, पण मला त्याचे पुस्तक करायचेच होते, असे भटकळ यांनी म्हणताच, किशोर कदम यांनी एक मोठी कबुलीच जाहीरपणे दिली. ते म्हणाले, ‘खरंतर मी माझे पुस्तक ग्रंथालीला दिले होते, पण भटकळ साहेबांच्या प्रेमळ दबावामुळे मी ग्रंथालीशी खोटे बोलून ते पुस्तक परत घेतले आणि पॉप्युलरला दिले.’ त्यावर भटकळ त्वरित मिश्कीलपणे म्हणाले, ‘कवींना खोटं बोलायला लावणारा प्रकाशक ही ओळख नकोय मला...’

बाबा, तुमचं टॅलेंट वाया घालवू नकानिवृत्त झाल्यावर गाणं शिकावंसं वाटलं, असं का? असा प्रश्न करताच भटकळ म्हणाले, ‘शाळेत असतानाही मी गाणं शिकत होतो, पण नंतर नंतर ते मागे पडलं. मुलं मोठी होत होती. मला जमलं नाही. मुलांनी तरी गाणं शिकावं, असं वाटत होतं.’ सत्यजीत सतार शिकत होता. तेव्हा तो मला म्हणाला, ‘बाबा, तुमचं टॅलेंट वाया घालवू नका...’ एरव्ही बाप मुलाला सांगतो, पण इथे मुलाने बापाला सांगितलं होतं. त्यानंतर १९८० मध्ये पुन्हा सुरुवात केली, तेव्हा मी ४५ वर्षांचा होतो.

असे भेटले ग्रेस आणि ना. धों. महानोर ‘नवे कवी नवी कविता’ याची सुरुवात कशी झाली, हे सांगताना भटकळ यांनी कवी ग्रेस आणि ना. धों. महानोर यांची पुस्तके कशी प्रकाशित केली, त्याची आठवण सांगितली. ते म्हणाले, ग्रेस, महानोर यांची पुस्तके प्रकाशित केली, तेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष ओळखत नव्हतो. 

ग्रेस यांची कविता मी छंदमध्ये वाचली. त्यांच्या दहा-पंधरा कविता एकत्र छापल्या होत्या. त्यावेळेस ग्रेस हे बाई की बुवा यातही वाद होते.  

‘नवे कवी नवी कविता’ ही जर मालिका केली तर खूप चांगले होईल, असे वाटू लागले. त्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली. त्यात वा. ल. कुलकर्णी, मंगेश पाडगावकर आणि शिरीष पै होते. त्यांनीसुद्धा ग्रेस यांचेच नाव सांगितले. पुढे वा. ल. यांचे एक दिवस मला पोस्टकार्ड आले, ‘अरे, ना. धों. महानोर नावाचा एक नवीन मुलगा आहे. तू ताबडतोब त्यांना पत्र लिही. तसा तुम्हाला पुस्तक काढायला वेळ लागतो, पण याला वेळ न लावता त्याचे पुस्तक काढा.’ मग आम्ही लगेच ग्रेस आणि महानोर यांची पुस्तके ‘नवे कवी नवी कविता’ एक आणि दोन म्हणून प्रकाशित केली व त्यांची भेट ही पुष्कळ नंतर झाली. 

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्य