शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

शाळेजवळच टाकली रसायनांची पिंपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 04:05 IST

पूर्वेकडील खैरापाडा जवळील टिन्स वर्ल्ड या शाळेच्या परिसरात टाकलेल्या रसायनांच्या पिंपातून धूर व डोळे चुरचुरणारा वायू निघू लागल्याने सुरक्षिततेचा

- पंकज राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : पूर्वेकडील खैरापाडा जवळील टिन्स वर्ल्ड या शाळेच्या परिसरात टाकलेल्या रसायनांच्या पिंपातून धूर व डोळे चुरचुरणारा वायू निघू लागल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून ८५० विद्यार्थ्यांना घरी पाठवावे लागले. विल्हेवाटीसाठी ही पिंपे मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडे पाठविण्यात आली आहे.या गंभीर घटनेची माहिती शाळा व्यवस्थापन व जागृत नागरिकांकडून मिळताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तारापूर अग्निशमनदल व बोईसर पोलीसांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्या रसायनांच्या पिंपातून निघणाऱ्या धुरयुक्त वायूमुळे डोळे चुरचुर असल्याचे लक्षात येताच प्रथम शाळा सोडून शाळेतील विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले.रसायनांनी भरलेली दोनशे लिटर क्षमतेची अकरा पिंपे फेकून देण्यात आली होती. त्यापैकी तीन पिंपातील रसायन पृथ:करणासाठी काढण्यात आले. त्या रसायनांचा रंग पिवळसरच होता तर काही पिंपातून रसायन बाहेर पडून पसरल्याने हिरवेगार गवत जळून गेले होते.एका पिंपावर अक्र ी आॅर्गेनिक्स प्रा.लि.चे नाव असल्याने तिच्या अधिकाऱ्यांनीही बोलविण्यात आले होते मात्र त्यांनी त्या पिंपातून मोनो इथेलीन ग्लायोन प्रॉडक्ट हे रसायन मेसर्स मोल्ट्स रिसर्च लॅबोरेटरीला( प्लॉट नं एन ५९ ) विकले असून त्याचे इन्व्हाईस असल्याचेही सांगितले.दरम्यान मोल्ट्स रिसर्च लॅबच्या अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी बोलावून चौकशी केली असता त्यांनी ती रिकामी पिंप अवधनगर येथील भंगारवाल्याना दिल्याचे स्पष्ट केल्याने निश्चित ती पिंप कुठल्या कंपनीची आहेत याचा संपूर्ण तपास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिसांनी सुरू केला आहे. तर या संदर्भात टिन्स वर्ल्डने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ , बोईसर पोलीस व टीमाला आज पत्र लिहून उघडयावर फेकून देण्यात आलेल्या या रसायनांच्या पिंपाची विल्हेवाट लावण्याची विनंती केली आहे रात्रीची पोलीस गस्त सुरू होणार तरी कधी ?तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांतून उत्पादन प्रक्रि येनंतर निघालेला रासायनिक घनकचरा व घातक रसायने ही विल्हेवाट करीता मुंबई वेस्ट मॅनेजमेंट किंवा संबंधित यंत्रणेकडे पाठविणे बंधनकारक असतांना या विल्हेवाटी करिता येणारा खर्च वाचविण्यासाठी काही कंपन्या रात्रीच्या वेळी ती मोकळ्या जागी फेकून देत असल्याच्या अनेक घटना आता पर्यंत घडल्या आहेत मात्र खऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फारसे प्रयत्न होत नसल्याने अशी गैर कृत्य करणाऱ्यांवर वचक राहिली नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.आज ज्या कुठल्या कंपनीने किंवा ठेकेदाराने शाळेच्या जवळ अत्यन्त ज्वलनशील, घातक रसायनांची पिंपे टाकली होती त्याचा तातडीने शोध घेण्यात यावा. त्यातून सांडलेल्या केमिकल मधून उग्र वास येत होता व डोळे चुरचुरत होते त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करते काय? रात्रीची गस्त सुरू करावी असे निवेदन आम्ही अनेक वेळा दिले आहे परंतु त्याची दखल आजवर ना मंडळाने घेतली ना पोलिसांनी घेतली.विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा पद्धतीने घातक रसायन उघडयावर व ते ही शाळेपासून काही अंतरावर फेकणे ही खूप गंभीर बाब आहे. - राजेश निनावे, मुख्याध्यापक, टिन्स वर्ल्ड स्कूलअज्ञात केमिकलचे नमुने घेऊन पृथ:करणासाठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले आहे. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित कंपनीचा शोध घेऊन कारवाई केली जाईल.- डॉ. राजेंद्र ए.राजपूत, उप प्रा. अधिकारी म.प्र. नि.मंडळ तारापूर २