शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आयोध्या नगरीत प्रेमप्रतिक इमारतींमध्ये पाइप गॅस पुरवठा सुविधा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 17:21 IST

सिलेंडरच्या जाचातून गृहिणींची होणार सुटका

डोंबिवली: महानगर गॅसच्या माध्यमातून घराघरात पाईप गॅसची सुविधा देण्याचा प्रकल्प २०१२ पासून सुरु झाला. तेव्हापासू शुभारंभ झालेल्या कामामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्याने तो लांबला होता, परंतू आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अडचणी हळुहळु  सोडवल्या. त्यानूसार आधी जिमखाना परिसरात तर शुक्रवारपासून अयोध्या नगरितील प्रेमप्रतिक ईमारतीच्या रहिवाश्यांना त्याचा लाभ मिळायला सुरुवात झाली. आगामी काळात तेथे आणखी ३५० घरांमध्ये ती सुविधा मिळेल असा विश्वास महानगर गॅसचे अधिकारी, शिवसैनिकांनी व्यक्त केला.

संपूर्ण डोंबिवली शहरात हे काम जलदगतीने पुरे करण्याचा संकल्प शिंदे यांनी केला आहे. आयोध्या नगरीत घराघरात गॅस सुरू करण्याच्या कामाचा शुभारंभ शिवसेना कल्याण उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी केला. त्यामुळे लवकरच शहरातील गृहिणींचा सिलेंडरच्या जाचातून सुटका होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

गॅस वाहीनी भूमिगत टाकण्याचे काम महानगर गॅस कंपनी कडून चालू असून या गॅसच्या वाहीनी भूमिगत टाकण्यात महानगरला अनेक टप्प्यावर अडचणी येतात. या अडचणींतून सुटका व्हावी म्हणून खासदार शिंदे त्या सोडवत असतात. त्यासंदर्भात शुभारंभापासून या प्रकल्पाचा पाठपुरावा करणारे शिवसैनिक प्रफुल्ल देशमुख यांनी त्या कामाची माहिती उपस्थितांना दिली. त्यावेळी पक्षाचे उपशहरप्रमुख अभिजीत थरवळ, विवेक खामकर,विभागप्रमुख अमोल पाटील, शाखाप्रमुख संजय मांजरेकर, लक्ष्मीकांत अंबरकर आदिंसह शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणेShiv Senaशिवसेना