शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
3
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
4
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
6
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
7
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
8
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
9
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
10
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
11
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
12
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
13
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
14
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
15
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
16
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
17
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
18
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
19
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
20
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?

येशूबाळाची पालखी साधूंच्या खांद्यावर

By admin | Updated: December 28, 2015 01:58 IST

एका हिंदु मंदिरातून येशूबाळाची पालखीतून निघालेली मिरवणूक. पालखी हिंदू महंताच्या खांद्यावर. तर टाळ-मृदुंग आणि ढोलकीच्या तालावर हरिनाम आणि रामनामाचा अभंगाच्या गजरात

शशी करपे, वसईएका हिंदु मंदिरातून येशूबाळाची पालखीतून निघालेली मिरवणूक. पालखी हिंदू महंताच्या खांद्यावर. तर टाळ-मृदुंग आणि ढोलकीच्या तालावर हरिनाम आणि रामनामाचा अभंगाच्या गजरात पालखी थेट ख्रिश्चन संस्थेत पोचते. पालखी सोहळ्यात विविध धर्मींचा सहभाग, असे अनोखे सर्वधर्मीय एकतेचे दर्शन घडवणारे दृश्य उमेळे गावात पहावयास मिळाले.नाताळनिमित्ताने वसईत निरनिराळया धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमात रेलचेल सुरु आहे. पण, उमेळे गावात अभंग भवन संस्थेचे फादर मायकल जी आणि सिंथिया बॅप्टिस्टा यांनी नाताळनिमित्ताने आगळ्यावेगळ्या सर्वधर्मीय नाताळ मेळाव्याचे आयोजन केले होते. उमेळा गावदेवी साकाई माता मंदिरा-तून येशूबाळाची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. उमेळा महिला भजन मंडळी आणि पाचूबंदर गोपाळकृष्ण भजन मंडळीने ढोलकीच्या तालावर हिंदू भजने म्हटली. गिरीधर आश्रमातील भगव्या वेषातल्या महंतांनी पालखी खांद्यावर घेऊन ती ख्रिश्चन संस्था असलेल्या अभंग भवनापर्यंत आणली. दयामाता मंडळ व रमेदी चर्च यांनी नाताळ गीते ऐकवून स्वागत केले. गायिका सुविद्या पाटोळे यांनी येशूची गाणी ऐकवली. निष्कलंक चर्चच्या गायकवृंदाने कॅरलमध्ये ख्रिस्ती प्रार्थना म्हटली. मौलाना शेख यांनी ख्रिस्त जन्मकथा कथन केली. त्यानंतर झालेल्या सर्वधर्मीम मेळाव्यात आशिष शिंदे, सिस्टर सुमा, स्वामी महाराज, मौलाना एजाज अहमद शेख, रॉबर्ट फर्नांडीस, हेमंत राऊत आदी मान्यवर हजर होते.