शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

अग्निशमन केंद्राचाही फोन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 23:03 IST

महावितरणचा दणका; डिझेल भरण्यास पैसे नसल्याने जनरेटर सेटही ठप्प

बोईसर : वीज बिल थकविल्यामुळे बी एस एन एल च्या तारापूर दूरध्वनी केंद्राचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केल्याने पालघर जिल्ह्यातील बीएसएनएलचे हजारो दूरध्वनी व भ्रमणध्वनी आणि इंटरनेट सेवा बुधवार संध्याकाळ पासून ठप्प झाली आहे विशेष गंभीर बाब म्हणजे तारापूर अग्निशमन दलाचे दूरध्वनी बंद झाल्याने आगीची घटना घडल्यास अग्निशमन दलाशी संपर्क साधता येणार नसल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे.बीएसएनएलच्या तारापूर दुरध्वनी केंद्राचे ज्युनियर टेलिकॉम आॅफिसर यांच्या नावी असलेल्या ०७३०१०००७०४३ या कंझुमर नंबर चे मागील वीज बिल ६ लाख ९५ हजार ७०० रुपये असून दिनांक ३ नोव्हेंबर, २०१८ रोजी ते भरले होते. परंतु, आता चालू बील रुपये २ लाख ८३ हजार आणि मागील थकबाकी ६ लाख ४४ हजार असे एकूण ९ लाख ३२ हजार ३१० भरणे बाकी आहे त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मोबाईल टॉवर ऑप्टिकल फायबर केबल ( ओएफसी ) द्वारे सर्व दूरध्वनी केंद्र जोडले गेली आहेत. खंडित केलेल्या वीज पुरवठ्यामुळे पालघर, डहाणू व तलासरी या तीन तालुक्यामधील गावागावांमध्ये असलेले सुमारे ४० दूरध्वनी केंद्र ठप्प झाली आहेत.अत्यावश्यक म्हणून दिले भ्रमणध्वनीअत्यावश्यक म्हणून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:चे मोबाईल नंबर दिले आहेत. अनंत परब अग्निशमन अधिकारी ८१०८०७७७८७, सहाय्यक अग्निशमन अधिकारी दिनेश अंबुरे, ९९२२९४६१०१, उपअग्निशमन अधिकारी हरेश्वर पाटील ७०२०१९७६०८ आदी.तारापूर दुरध्वनी केंद्र येथून पालघर, डहाणू , तलासरीची दूरध्वनी सेवा कार्यान्वित होते. वीज नसल्याने सर्वसवर परिणाम झाला आहे. बील लवकरत भरण्यासाठी वरिष्ट पातळीवरु न प्रयत्न करीत आहोत अशी माहिती सब डिविजनल इंजिनिअर ओ. पी. सिंंग यांनी दिली.बीएसएनएलच्या तारापूर दूरध्वनी केंद्राने तीन मिहन्यापासून वीज बिल भरणा न केल्याने वीज पुरवठा खंडित केला आहे . या वीज बिल भरणा संदर्भात वारंवार सूचना देण्यात येत होत्या शेवटी नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित करण्यात आला.लक्ष्मण राठोड,उपकार्यकारी अभियंतामहावितरण एमआयडीसी तारापूर.