शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी चालकांची जामिनासाठी न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:58 IST

पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी पेट्रोलपंप मालकांविरोधात अटकेची कारवाई सुरू केली असून, ‘रडार’वर असलेल्यांपैकी १२ मालकांसह दोन व्यवस्थापक आणि एक तंत्रज्ञ (टेक्निशिअन) अशा १५ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण न्यायालयात धाव घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पंकज रोडेकर ।ठाणे : पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी पेट्रोलपंप मालकांविरोधात अटकेची कारवाई सुरू केली असून, ‘रडार’वर असलेल्यांपैकी १२ मालकांसह दोन व्यवस्थापक आणि एक तंत्रज्ञ (टेक्निशिअन) अशा १५ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण न्यायालयात धाव घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.पेट्रोलपंपांवरील डिझेल-पेट्रोल डिस्पेन्सिंग युनिटमधील पल्सरकार्ड, मदरबोर्ड, कंट्रोल की पॅड यामध्ये फेरफार करून ग्राहकांना कमी डिझेल-पेट्रोल वितरित होत असल्याचे कारवाईत निष्पन्न झाले होते. या प्रकरणी १७ जून २०१७ रोजी डोंबिवलीत पहिली कारवाई करीत, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, राज्यभरात ठाणे पोलिसांनी छापे टाकण्यास सुरुवात केली. महाराष्टÑातील २१ जिल्ह्यांत तर ओडिशा राज्यातील २ ठिकाणी इंडियन आॅइल ८७ पंप, हिंदुस्थान पेट्रोलियम ६९ पंप, भारत पेट्रोलियम १४, एरसार पेट्रोलियम ८ पंप अशा एकूण १७८ पेट्रोलपंपांवर कारवाई केली आहे. ही कारवाई करताना, ठाणे पोलिसांनी २४ जणांना अटक केली. त्यापैकी २३ जणांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्रही सादर करण्यात आले. या कारवाईनंतर पोलिसांनी संबंधित पेट्रोलियम कंपनीकडे दोषी युनिट तपासणीसाठी पाठविले होते. त्या कंपनीच्या अहवालात सध्या ४७ जण पोलिसांच्या ‘रडार’वर आले. त्यानुसार, ११ सप्टेंबर रोजी पहिली कारवाई केली. अशा प्रकारे नुकत्याच तीन कारवाया करत, एकूण तीन मालकांसह पाच जणांना अटक केली. त्यामुळे अटकेतील आरोपींचा आकडा आता २९ वर गेला आहे. त्यापैकी २७ जणांची न्यायालयीन कोठडीमुळे कारागृहात रवानगी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.पोलिसांच्या ‘रडार’वरील मालकांवर कारवाईचा बडगा उगारून, एका आमदाराच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे उर्वरित ४२ जणांवर कोणत्याही क्षणी अटकेच्या कारवाईची टांगती तलवार असल्याने, त्यापैकी १५ जणांनी अटक होऊ नये, यासाठी त्यांना न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणून अर्ज केला आहे.>डंबरूधरला पोलीस कोठडीतंत्रज्ञ डंबरूधर याला रविवारी न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डंबरूधर याने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांचे पथक ओडिशाला दाखल होऊन, २२ पंपांची तपासणी करणार आहेत.