शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी याचिकाकर्त्यांची'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 05:42 IST

भिवंडी न्यायालयात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल असलेल्या अवमान याचिकेची शुक्रवारी सुनावणी झाली.

भिवंडी : भिवंडी न्यायालयात काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल असलेल्या अवमान याचिकेची शुक्रवारी सुनावणी झाली. या वेळी आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी याचिकाकर्त्यांची असल्याचे सांगत राहुल यांच्या वकिलांनी आरोप फेटाळून लावले. पुढील सुनावणी १० सप्टेंबरला होणार आहे.लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केल्याचा आरोप राहुल यांनी केला होता. त्याविरोधात राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी मुख्य न्यायाधीश ए.आय. शेख यांच्या न्यायालयात झाली. त्या वेळी कुंटे यांचे वकील अ‍ॅड. नंदू फडके यांनी राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यासंदर्भात उच्च न्यायालयात सादर केलेला भाषणाचा लिखित उतारा मान्य आहे की नाही, अशी विचारणा या अर्जाद्वारे केली. त्यावर, आरोपी पक्षाचे वकील अ‍ॅड. संदीप पाचबोल यांनी हरकत घेत राहुल यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेला भाषणाचा उतारा हा स्वत:च्या बचावासाठी केला आहे. मात्र, अवमान याचिकेसंदर्भात पुरावा सादर करण्याची जबाबदारी ही फिर्यादी पक्षाची असल्याचे सांगत याचिकाकर्त्यांचे आरोप फेटाळून लावले. सुनावणीदरम्यान कुंटे यांच्या वतीने अ‍ॅड. नंदू फडके, अ‍ॅड. गणेश धारगळकर, अ‍ॅड. प्रबोध जयवंत यांनी, तर राहुल यांच्या वतीनेअ‍ॅड. संदीप पाचबोल, अ‍ॅड.खुशाल मोर व अ‍ॅड. नारायणअय्यर यांनी बाजू मांडली. याप्रकरणी पुढील सुनावणी १० सप्टेंबरला होणार आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस