शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायकारक वीजबिल दरवाढीविरोधात सोमैय्या, निरंजन डावखरे यांची याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 16:25 IST

राज्य सरकार व महावितरणाविरोधात तक्रार करून दरवाढ तातडीने रद्द करून लॉकडाऊनच्या काळात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याची मागणी केली आहे.

ठाणे : लॉकडाऊनच्या काळात महावितरण कंपनीने केलेल्या अन्यायकारक वीजबिल दरवाढीविरोधात भाजपाचे ठाणे प्रभारी किरीट सोमैय्या, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्य सरकार व महावितरणाविरोधात तक्रार करून दरवाढ तातडीने रद्द करून लॉकडाऊनच्या काळात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याची मागणी केली आहे.

भाजपाच्या ठाण्यातील जिल्हा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमैय्या व आमदार निरंजन डावखरे यांनी ही माहिती दिली. लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना आलेल्या भरमसाठ वीज बिलांकडे याचिकेद्वारे आयोगाचे लक्ष वेधण्यात आले आहे. अनेक ग्राहकांना सरासरी बिलाच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा बिले पाठवण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद असताना शेकडो युनिटचा वापर केल्याबद्दल ग्राहकांना बिल पाठवण्यात आले. तर घरगुती ग्राहकांनाही अशाच पद्धतीने चुकीची बिले पाठविण्यात आली आहेत. सामान्य माणसाला ही भरमसाठ वीज बिले भरणे शक्य नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने केलेली दरवाढ तातडीने रद्द करावी, लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले भरण्यासाठी ६ महिने मुदतवाढ द्यावी, या काळात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत द्यावी आदी मागण्या याचिकेद्वारे राज्य वीज नियामक आयोगापुढे करण्यात आल्या आहेत. ग्राहकांना पाठविण्यात आलेल्या अवाजवी वीज बिलांची फेरतपासणी करावी, बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यास स्थगिती द्यावी, १०० युनिटपर्यंत मोफत वीज व ३०० युनिटपर्यंत वीजवापर झालेल्या कुटुंबांना ५० टक्के सवलतीच्या दराने वीज द्यावी, २५ टक्क्यांहून जास्त विजेचा वापर झालेल्या वीजबिलांच्या वसुलीलाही स्थगिती द्यावी आदी मागण्या याचिकेत नमूद करण्यात आल्या आहेत. या मागण्या मान्य करण्यासंदर्भात राज्य सरकार व महावितरण कंपनीला आदेश द्यावेत, अशी विनंती किरीट सोमैय्या आणि आमदार डावखरे यांनी वीज नियामक आयोगाला केली आहे. त्याचबरोबर अवाजवी बिलांच्या प्रतीही आयोगाकडे सादर केल्या आहेत.उत्पन्न बंद, पण वीजबिल वाढले : निरंजन डावखरेलॉकडाऊनच्या काळात हातावर पोट व छोट्या नोकऱ्या करणाऱ्यांचा रोजगार बुडाला. व्यावसायिकांचे व्यवसाय बंद झाला. मात्र, वीजबिल प्रचंड वाढले, हा प्रकार संतापजनक आहे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली. ------------------जादा बिलबिलांच्या तक्रारीव्हॉट्स अॅपवर पाठविण्याचे आवाहनठाणे महापालिका क्षेत्रातील हजारो नागरिकांना जादा वीजबिले पाठविण्यात आली आहेत. या बिलांची छायाचित्रे व आपली तक्रार श्री. धनंजय थिटे यांच्या ९९२०७८१६२६ या व्हॉट्स अॅप क्रमांकावर पाठवावी. ग्राहकांच्या तक्रारी महावितरण कंपनीकडे पोचवून न्याय मिळवून दिला जाईल, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे.