शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 18:26 IST

मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली करण्यात आली आहे.

Mira Bhayandar CP Transfer: मीरारोडमध्ये राठीच्या मुद्द्यावरुन दुकानदाराला झालेल्या मारहाणीवरुन व्यापाऱ्यांनी मराठी भाषिकांविरुद्ध मोर्चा काढला होता. त्यानंतर मंगळवारी मराठी भाषिकांकडून मीरारोडमध्ये मोर्चाची हाक देण्यात आली. या मोर्चात मनसे, उद्धवसेना, मराठी एकीकरण समितीसह विविध मराठी भाषिक संघटना रस्त्यावर उतरणार होत्या. मात्र या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यानंतर सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोर्चा काढला. अशातच आता मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. पांडे यांच्या जागी निकेश कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   

परप्रांतीय व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाची हाक देण्यात आली होती. मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार होता. मात्र त्याआधीच मोर्चाला परवानगी नाकारत मराठी कार्यकर्त्यांच्या धरपकडीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. रात्रीपासून या परिसरात पोलिसांनी आंदोलकांविरोधात कारवाई करत अनेक कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे संघर्ष आणखी वाढला. मात्र पोलीस प्रशासन मोर्चा न काढू देण्यावर ठाम होतं. सर्व विरोधाला झुगारून मराठी माणसांनी मोठ्या संख्येने मोर्चाला हजेरी लावली आणि मोर्चाला सुरूवात झाली. दुसरीकडे पोलिसांनी मोर्चाला परवानगी का नाकारली? असा सवाल करत मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली.  

मुख्यमंत्री वैतागले - प्रताप सरनाईक

"मला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितले. मुख्यमंत्री पोलीस महासंचालकांशी बोलले आहेत. मुख्यमंत्री पोलीस आयुक्तांशी बोलले आहेत. मुख्यमंत्री सुद्धा वैतागले होते, पोलिसांच्या भूमिकेबद्दल. राज्य सरकारचा पोलिसांना पाठिंबा होता असे नाही. स्थानिक पातळीवर त्यांनी निर्णय घेतले, ते कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतले. मी या शहराचा आमदार आहे. मी मंत्री आहे, माझ्याशी चर्चा करायला हवी होती. गृह खात्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी होती. पण, कुणाशीच चर्चा न करता पोलिसांनी हे निर्णय घेतले, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं. 

टॅग्स :mira roadमीरा रोडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसे