शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

 वेध परतीच्या पावसाचे : विजांचा कडकडाट आणखी काही दिवस, दिवाळीच्या खरेदीपर्यंत बरसणार सरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 06:17 IST

सध्या विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पडणारा पाऊस धडकी भरवत असला, तरी या महिनाअखेरपर्यंत अशाच स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाची अधूनमधून हजेरी लागणार असल्याने दिवाळीच्या खरेदीच्या काळातही हा पाऊस ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना सोबत करेल, असे हा अंदाज सांगतो.

ठाणे : सध्या विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पडणारा पाऊस धडकी भरवत असला, तरी या महिनाअखेरपर्यंत अशाच स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाची अधूनमधून हजेरी लागणार असल्याने दिवाळीच्या खरेदीच्या काळातही हा पाऊस ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना सोबत करेल, असे हा अंदाज सांगतो.गेले चार दिवस वेगवेगळ््या वेळी पडणारा पाऊस सोबत विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट घेऊन येतो आहे. प्रचंड कडकडाटामुळे धडकी भरावे असे वातावरण असले, तरी या महिना अखेरीपर्यंत अधूनमधून असाच पाऊस पडत राहण्याची शक्यता आहे. तसेच पुढील पंधरवडाभर तरी जोरदार सरी कोसळतील, अशीही शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. नंतर मात्र त्यांचे प्रमाण कमी कमी होत जाईल. मात्र या काळात कडकडीत ऊन, आर्द्रतेमुळे घामाच्या धारा आणि त्यात दिलासा देणारा पाऊस असेच चित्र अनुभवायला मिळेल.हा पाऊस जरी परतीचा असला, तरी तो जाता जाता जोरदार हजेरी लावून जातो, असे आजवरचे चित्र आहे. त्यातही साधारणत: चार महिने गृहीत धरला जाणारा पाऊस हल्ली दोन महिन्यातच सरासरी पूर्ण करतो, असाही आलेख हवामान खात्याने मांडला आहे. यंदाही तसेच चित्र असले; तरी पावसाळ््याच्या संपूर्ण काळात अनुभवायला मिळाला नाही, इतका विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सध्या अनुभवायला मिळतो आहे. त्याची तीव्रता महिनाअखेरपर्यंत कमी होत जाण्याची शक्यता आहे. मात्र आॅक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाच्या सरी कोसळणार असल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाºयांना हा पाऊस सोबत करण्याची शक्यता आहे.आॅक्टोबर हीट वाढणार : आॅक्टोबर हिटच्या काळात साधारण ३३ अंशापर्यंत सरासरी तापमान असते. पण यंदा ते ३७ ते ३८ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. प्रत्यक्षात तापमान तेवढे असले तरी आर्द्रता, वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे होणारे प्रदूषण-त्यातून झालेली तापमानवाढ आणि काँक्रिटीकरणामुळे वाढलेले तापमान यांच्या परिणामामुळे त्याचे चटके ३८ ते ४० अंश सेल्सियस इतके जाणवतील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.गरब्यालाही सोबत : पुढच्या आठवड्यात २१ सप्टेंबरपासून सुरू होणारे नवरात्र जरी २९ तारखेला संपणार असले तरी गरबा मात्र १ आॅक्टोबरपर्यंत सुरू राहील, अशी चिन्हे आहेत. महिनाअखेरपर्यंत पावसाच्या दमदार सरी कोसळणार असल्याने रास दांडियाच्या उत्साहाच्या सोबतीला पावसाचीही हजेरी असेल.