शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरांमध्ये वाढतोय दलालांचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 06:48 IST

लाच देणे आणि लाच घेणे हा गुन्हा आहे, असे फलक हमखास शासकीय कार्यालयात नजरेस पडतात. तरीही, सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करून त्यांच्याकडून लाच घेतली जाते.

ठाणे  - लाच देणे आणि लाच घेणे हा गुन्हा आहे, असे फलक हमखास शासकीय कार्यालयात नजरेस पडतात. तरीही, सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करून त्यांच्याकडून लाच घेतली जाते. त्यातच यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)मोठ्या प्रमाणात जनजागृती हाती घेतल्याने कारवाईचे प्रमाण वाढू लागले आहे. या कारवायांमध्ये लोकसेवकच नाही, तर खाजगी व्यक्ती (दलाल) यांचा टक्का वाढू लागला आहे. तो मागील दीड वर्षातील एकूण कारवाईत सुमारे ४० टक्के इतका असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातच अशाप्रकारच्या एका गुन्ह्यात एक दलाल व्यक्तीला न्यायालयाने नुकतीच शिक्षाही ठोठावली आहे. कारवाई केलेल्या तपासात पकडलेले दलाल प्रामुख्याने महसूल विभागाशी निगडित ठिकाणी पकडल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.शासननिर्मित ३९ विभाग आहेत. त्या सरकारी कार्यालयांतपैसे घेतल्याशिवाय कामे होत नाही, असा समज असतानात्या संबंधित ठाणे एसीबी विभाग दरवर्षी जनजागृती मोहीम हाती घेऊन नागरिकांना जागृत करण्याचे काम करतो. यातून तक्रारीचे प्रमाण वाढले असून आलेल्या तक्रारीची खातरजमा झाल्यावर लाचेची मागणी करणाºयांविरोधात सापळा लावून कारवाई करण्यात येते. त्यामध्ये लोकसेवकांसह आता खाजगी व्यक्तीही मोठ्या प्रमाणात पकडले जात आहेत. अशाप्रकारे ठाणे एसबीसी कार्यक्षेत्रात मागील दीड वर्षात १४७ ठिकाणी सापळे लावण्यात आले. या कारवाईत, एकूण २०८ जणांना रंगेहाथ लाच घेताना पकडले. यामध्ये ३३ जण खाजगी व्यक्ती असल्याचे समोर आले आहे.लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार केली जाते. यामध्ये साधारणत: सहा महिन्यांपासून ते एक वर्षापर्यंत शिक्षा होते. तसाच एक निकाल नुकताच न्यायालयाने दिला आहे. तसेच खाजगी व्यक्तींवर कारवाई केल्यानंतर तपास करताना फारसे काही अडथळे येत नाहीत. त्यातच, त्याच्या चौकशीत लोकसेवकापर्यंत पोहोचता येते.सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृतीलोकसेवकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकाही लोकसेवकाला अटक झालेली नाही. सर्वसामान्य नागरिक प्रचंड जागृत झालेला आहे. तो पैसे मागितल्यावर तातडीने तक्रारीसाठी एसीबीच्या कार्यालयात येतो. अन्यथा, तो थेट एसीबीच्या मुख्यालयात जाऊनही तक्रार करतो.त्यामुळे कारवाईचे प्रमाण वाढले आहे. पोलीस दलात प्रामुख्याने लोकसेवक पकडले जात आहेत. तर,खाजगी व्यक्ती हे महसूल विभागात पकडले गेल्याची माहिती एसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने नाव न छापण्याचा अटीवर माहिती दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाCorruptionभ्रष्टाचार