शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

लोकांना लुबाडणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:10 IST

१३ आरोपींना ठोकल्या बेड्या; २0 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, पोलिसांना यश

ठाणे : वयोवृद्ध नागरिकांना जुनी ओळख असल्याचे भासवून तसेच बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या दहा जणांच्या टोळक्यासह सोनसाखळी खेचून पळ काढणारे तिघे अशा १३ जणांच्या टोळीला नौपाडा, कळवा आणि ठाणेनगर पोलिसांच्या विविध पथकांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून २० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली.बँकेत तसेच सराफाच्या दुकानांमध्ये येणाºया वयोवृद्ध नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांना नोटांसारख्या कागदांचे बंडल देऊन ही टोळी खरे पैसे घेऊन पसार होत होती. ठाणेनगर पोलिसांनी १२, कळवा पाच, नौपाडा १४ तर राबोडी एक अशा फसवणुकीच्या ३२ तर सोनसाखळी चोरीच्या आठ गुन्ह्यांची त्यांच्याकडून उकल केली आहे. त्यांच्याकडून ६६१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३० हजारांची रोकड असा २० लाख तीन हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहितीही स्वामी यांनी दिली.गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे परिसरात असे प्रकार वाढल्याने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त स्वामी यांना हे गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर, उपनिरीक्षक कृष्णा बाबर तसेच नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आणि संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे तसेच कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस शेखर बागडे आणि उपनिरीक्षक सय्यद आदींच्या पथकाने या टोळीला जेरबंद केले. यामध्ये राजू शेट्टी (रा. अँटॉप हिल), रमेशकुमार जैस्वाल (रा. मुंबई), विलास दळवी (रा. उल्हासनगर), दिनेश सुराडकर (रा. उल्हासनगर), संजय महांगडे (सध्या पोलीस कोठडीत) , मोहम्मद आसीम मनीहार संजय महांगडे, मोहम्मद मनीहार (रा. आंबिवली) गणेश लोंढे (रा. मुंबई), शारबोन इस्लाम (रा. मुंब्रा ), शंकर उर्फ मरीअप्पन मुरगेशन (सध्या पोलीस कोठडीत), कुष्णकुमार सिंग, प्रदीप पाटील (रा. म्हारळ, कल्याण) अर्जुन सलाट आणि अर्जुनभाई मारवाडी यांचा यात समावेश आहे. सात जणांना न्यायालयीन तर सहा जणांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यात इराणी, गुजराती आणि काही मराठी चोरट्यांचाही समावेश आहे.आरोपींवर होती पोलिसांची करडी नजरहे भामटे रस्त्याने जाणाºया वयोवृद्धांना अडवून त्यांना धार्मिक गोष्टी सांगून देवाची तसेच पोलीस अधिकाºयाची भीती दाखवून त्यांना सोन्याचे दागिने काढून ठेवण्यास सांगायचे. पन्नास पाऊले मागे वळून न बघता पुढे, जा अशी बतावणी करून ते दागिने लंपास करीत होते.शेठजीला मुलगा झाला असून पुढे साड्यांचे वाटप केले जात आहे. तुम्ही गरीब वाटायला हवे म्हणून दागिने काढून पिशवीत ठेवा अशी शक्कल लढवून ते वृद्धांना गंडा घालत होते. पोलीस पथकांनी टोळीच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्यांच्यावर नजर ठेवली आणि टोळीचा पर्दाफाश केला.

टॅग्स :Arrestअटकthaneठाणे