शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

"जेथे स्वच्छता दिसते तेथे लोक कचरा टाकत नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 09:24 IST

जेथे स्वच्छता असेल तेथे लोक कचरा टाकत नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केले.

ठाणे : ठाण्यातील प्रदूषण तुलनेने कमी असून, ते आणखी कमी करण्यासाठी जिथे जिथे जागा मिळेल तेथे झाडे लावून हरितपट्टे तयार करावेत, जेणेकरून ऑक्सिजन पार्क तयार होतील. तसेच मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करून शहरात जंगले तयार करावीत, त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. जेथे स्वच्छता असेल तेथे लोक कचरा टाकत नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केले.

बीएमसी पाइपलाइन येथे साठलेला कचरा साफ केल्यानंतर त्याठिकाणी ग्रीन पॅच तयार करून तो परिसर हिरवागार करा. जेणेकरून नागरिकांना फरक दिसेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. हे अभियान राज्यभर राबविणार असल्याचे  शिंदे म्हणाले. 

सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान ठाण्यातील वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांना होऊ नये, यासाठी वाहतुकीचे नियोजन करावे, त्याचप्रमाणे फेरीवाल्यांना हॉकर्स झोनमध्ये जागा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे. स्वच्छता अभियानाचे ठाणे महापालिकेने केलेले नियोजन हे उत्कृष्ट असल्याचा मुख्यमंत्र्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला. यावेळी सफाई कर्मचारी जयेश गायकवाड व अनिता शिरसाट यांचा प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सर्वंकष स्वच्छता मोहिमेला वागळे परिसरात पहाटे ६.३० वाजण्याच्या सुमारास प्रारंभ केेला. या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर,  पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हाधिकारी अशोक  शिनगारे, माजी आमदार  रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह अनेकांनी हाती झाडू घेत स्वच्छता केली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणे