शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

ताबा विलंबाने देणे भोवले, डेव्हलपर्सला ३५ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:36 IST

सदनिका विक्रीसाठी ग्राहकाकडून पैसे घेऊनही दीर्घकाळ त्याला सदनिकेचा ताबा न देणाऱ्या समर्थ विश्व डेव्हलपर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ३५ हजारांचा दंड सुनावला आहे.

ठाणे - सदनिका विक्रीसाठी ग्राहकाकडून पैसे घेऊनही दीर्घकाळ त्याला सदनिकेचा ताबा न देणाऱ्या समर्थ विश्व डेव्हलपर्सला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने ३५ हजारांचा दंड सुनावला आहे.अनिल मनसुखानी यांनी डेव्हलपर्सच्या नियोजित प्रकल्पात आठ लाख ५० हजारांना एक सदनिका आरक्षित केली. अनिल यांनी संपूर्ण रक्कम दिली आणि विक्री करारनामा केला. मात्र, डेव्हलपर्सने त्यांना सदनिकेचा ताबा दिला नाही. त्यानंतर, त्यांना दुसºया सदनिकेचा ताबा देण्याचे मान्य केले. त्याचा करारनामा केला. मात्र, २०१३ किंवा २०१५ मध्ये वेगवेगळ्या इमारती व सदनिकेचे करारनामे करून त्यापैकी दोन्हींचा ताबा दिला नाही. पाठपुरावा केला असता सर्व करारनामे रद्द करून रक्कम धनादेशाद्वारे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, धनादेश न वटता परत आल्याने मंचाकडे तक्रार दाखल केली. मंचाने डेव्हलपर्सला पाठवलेली नोटीस परत आली.कागदपत्रे, पुरावे यांची पडताळणी केली असता अनिल यांनी डेव्हलपर्सला साडे आठ लाख दिल्याचा बँकेचा खातेउतारा आहे. तसेच पर्याय म्हणून सुचवलेल्या तीन वेगवेगळ्या सदनिकांचे करारनामे असूनही ताबा दिलेला नाही.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अनिल यांनी पोलीस स्टेशनमध्येही डेव्हलपर्सविरुद्ध तक्रार दाखल केली. यावरून डेव्हलपर्सने पैसे घेऊनही सदनिकेचा ताबा न देता अनिल यांची फसवणूक केली आहे, असे मंचाने स्पष्ट केले. त्यामुळे डेव्हलपर्सने त्यांना सदनिकेचे करारनामे रद्द करून १५ लाख आणि मानसिक त्रास व न्यायिक खर्च मिळून ३५ हजार रुपये द्यावेत, असे आदेश मंचाने दिले आहेत.

टॅग्स :Homeघरnewsबातम्या