शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

घाण करणाऱ्या २३00 जणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:25 IST

ठाणे स्थानकाने अस्वच्छतेचा डाग पुसला; ४.११ लाखांचा दंड वसूल

- पंकज रोडेकर ठाणे : अस्वच्छ रेल्वेस्थानक म्हणून ठाणेरेल्वेस्थानकाचे ‘टॉप टेन’च्या यादीत नाव आल्यावर ठाण्यावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर, रेल्वे प्रशासनाने कंबर कसून हा डाग पुसून काढण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून त्याचा फटका रेल्वेस्थानकात थुंकणे असो, या कचरा करणाºया २३०० जणांना बसला आहे. या कारवाईनंतर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ठाणे रेल्वेस्थानकाने स्वच्छतेत ए श्रेणीत बेस्ट रेल्वेस्थानकाचा असा पुरस्कारही मिळवून हा डाग पुसून काढला आहे.ऐतिहासिक ठाणे रेल्वेस्थानकात एकूण १० फलाट आहेत. मध्य रेल्वेवर जलद-धीम्या लोकल सेवांसह ट्रान्स-हार्बर, एक्स्प्रेस आणि मालगाड्यांची वाहतूक सातत्याने सुरू असते. दिवसाला सात ते आठ लाख प्रवासी ठाणे रेल्वेस्थानकातून येजा करतात. त्यातच रेल्वेस्थानकातून आत आणि बाहेर जाण्यासाठी २६ गेट आहेत. गुटखा, पानमसाला यासारखे तंबाखुजन्य पदार्थ खाणारे फलाटावर मिळेल त्या जागेत थुंक तात. त्याचबरोबर खाद्यपदार्थ खाऊन झाल्यावर पिशव्या किंवा खाद्यपदार्थ टाकून पळ काढतात. गर्दुल्ले-भिकारी यांच्यामुळे स्थानकात अस्वच्छता पसरल्याने मध्यंतरी रेल्वेस्थानकाचे नाव टॉप टेनच्या यादी झळकले होते. त्यानंतर, रेल्वे प्रशासनाने जानेवारी ते जुलै २०१९ च्या या सात महिन्यांत दोन हजार २६० जणांना अस्वच्छता करताना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये फेब्रुवारी महिन्यात जवळपास एक हजार ८२५ जणांवर करवाई केली आहे. ही कारवाई तिकीट निरीक्षक (टीसी) विभागामार्फत रेल्वेस्थानकात तैनात असलेले २६ ठिकाणी तपासणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जनजागृती मोहीम राबवलीरेल्वेस्थानकातून जातायेता कुठेही न थुंकण्याचे, कचराकुंड्यांचा वापर करण्याचे, तसेच कुठेही कचरा करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. त्याबाबत प्रशासनामार्फत वेळोवेळी जनजागृती मोहीमही राबवण्यात येते. मात्र त्यातूनही उपयोन न झाल्यास कारवाईचा मार्ग पत्करला जातो. कारवाईचा बडगा यापुढेही सातत्याने सुरूच राहणार असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे