शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांना दंड; हरिनिवास सर्कलसाठी ठामपाचे फर्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 23:44 IST

घातक आजार पसरण्याची भीती

ठाणे : ठाण्यातील हरिनिवास सर्कलजवळ कबुतरांना अन्नधान्य, खाद्यपदार्थ टाकताना कुणी आढळल्यास त्याला ५०० रुपये दंडाची शिक्षा करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी ७ आॅक्टोबर रोजी जारी केले. या आदेशानंतरही या भागात कबुतरांना खाद्यपदार्थ टाकले जात असल्याची तक्रार ज्येष्ठ नागरिक महेंद्र मोने यांनी ठाणे जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्याकडे केली असून, यावर उपाय म्हणून येथे सीसी कॅमेरे लावण्याची मागणी त्यांनी केली आहे.

नौपाडा परिसरातील हरिनिवास सर्कलजवळ नेहमी अन्नधान्य, खाद्यपदार्थ टाकल्यामुळे कबुतरे मोठ्या संख्येने गोळा होतात. या कृत्रिम कबुतरखान्यातील कबुतरांपासून जीवघेणे आजार पसरण्याची शक्यता असल्याची तक्रार मोने यांनी ई-मेलद्वारे याआधी केली होती.तिची दखल घेऊन ठाणे पालिकेने तिथे अन्नधान्य टाकण्यास विरोध करणारे फलक लावले. अन्नधान्य टाकताना कोणी आढळल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्याचे याद्वारे पालिकेने स्पष्ट केले.अजूनही अन्नधान्य टाकून कबुतरांना गोळा केले जात असल्याचा आरोप मोने यांनी केला आहे. कबुतरांना गोळा करण्याचे काम अन्य रहिवासी, व्यापारी करीत आहेत. या कबुतरांमध्ये असलेले विषाणू जीवघेणे असल्याचे मोने यांनी जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनाला सांगितले होते. त्यानुसार, पालिकेने दंडाचे फर्मान काढूनही पुन्हा अन्नधान्य टाकून कृत्रिम कबुतरखाना तयार केल्याची तक्रार त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी, आयुक्तांना करून कारवाईची मागणी केली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका