शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत बेकायदा ३० रिक्षा, १० बस चालकांवर दंडात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 11:16 IST

बहुतांशी स्टँडवर फोर्थ सीट, बॅज नसणे, लायसन नसणे यासह वय कमी असतानाही बेकायदा रिक्षा चालवण्यात येत असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका आहे.

डोंबिवली: येथील बहुतांशी स्टँडवर फोर्थ सीट, बॅज नसणे, लायसन नसणे यासह वय कमी असतानाही बेकायदा रिक्षा चालवण्यात येत असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. अशा रिक्षा चालकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहरातील रामनगर, इंदिरा गांधी चौकातील काही रिक्षा चालकांनी केली होती. त्यानुसार रामनगर पोलीस, वाहतूक पोलीस नियंत्रक शाखेचे पोलीस, वॉर्डनने बुधवारी सकाळी भगतसिंग, फतेह अली रोडवर धडक कारवाई केली. त्यामध्ये ३० रिक्षा चालक, १० बस चालकांकडून दंड आकारण्यात आला.लोकमतच्या हॅलो ठाणेमध्ये ‘बेकायदा रिक्षांना घाला लगाम’या आशयाचे वृत्त येताच वाहतूक नियंत्रक, रामनगर पोलिसांनी सकाळी ७.३० वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत ही कारवाई केली. रिक्षा, बस चालकांनी गणवेश न घालणे, लायसन आणि वाहनांचे कागदपत्र न बाळगणे, यासह सर्रासपणे फोर्थ सीट अशी बेकायदा वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या नीदर्शनास आले. रामनगरचे पोलिस उपनिरिक्षक मनोहर घाडगे, हवालदार एस.इंगळे, नाना मुळे, रंगनाथ पाटील आदींसह वाहतूक पोलिस नियंत्रक शााखेचे पोलिस आणि वॉर्डन आदींनी संयुक्तपणे कारवाई केली. अशी कारवाई सातत्याने व्हावी, रिक्षा चालकांच्या मुजोरीला आळा घालावा अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली.सकाळी पहाटेच्या वेळेत आणि मध्यरात्री सर्वात जास्त प्रमाणात बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती रिक्षाचालकांनी यावेळी पोलिसांना दिली. त्यानूसार केवळ याच ठिकाणी नव्हे तर इंदिरा गांधी चौक, शिवमंदिर, चार रस्ता, रामनगर, राजाजी पथ, टंडन रोड, एमआयडीसी आदी सर्व ठिकाणी पोलिसांनी सतत पंधरा दिवस जरी कारवाई केली तरी काही प्रमाणात शिस्त लागु शकते, पण पोलिस त्यात सातत्य ठेवत नसल्याने कारवाई नाममात्रच असल्याचे दिसून येते असेही ते म्हणाले. पलावा, रिजन्सी यांसह अन्य खासगी कंपन्यांच्या बस चालकांनी, तसेच स्कूल व्हॅनच्या चालकांनाही दंड ठोठावण्यात आला. वाहनांची कागदपत्र न बाळगणे, लायसन नसणे यासह अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुचाकीस्वारांनाही टिबल सीट वाहन न चालवण्याची तंबी देण्यात आली. काहींना तासभर थांबवण्यात आले होते. त्यानंतर मात्र समज देत सोडण्यात आले. या सर्व कारवाईमध्ये आरटीओ, कल्याणचे पथकाचा देखिल समावेश असता तर वाहनचालकांमध्ये दबदबा निर्माण झाला असता. आरटीओ अधिका-यांनी याची नोंद घ्यावी अशी अपेक्षा पोलिस कर्मचा-यांनी व्यक्त केली. आरटीओचे पथक दिवसभरातून विविध वेळांमध्ये शहरात येत असून कारवाई करते असे चित्र व्हायला हवे. पण आभावानेच आरटीओ येथे येतात, त्यामुळे त्यांचा वचक वाहनचालकांवर रहात नसल्याचेही वाहतूक नियंत्रक पाेिलसांनी सांगितले.