शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत वाहतूक विभागाची २१ मद्यपिंसह १६ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 17:41 IST

होळीसह धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी डोंबिवली शहर वाहतूक विभागाने गुरुवार-शुक्रवार असे दोन दिवस चोख बंदोबस्त लावला होता. त्यात होळीच्या रात्री आणि धुळवडीच्या दिवसा सुमारे २१ मद्यपिंसह १६ दुचाकीस्वारांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईला यशनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई

डोंबिवली: होळीसह धुळवडीच्या उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी डोंबिवली शहर वाहतूक विभागाने गुरुवार-शुक्रवार असे दोन दिवस चोख बंदोबस्त लावला होता. त्यात होळीच्या रात्री आणि धुळवडीच्या दिवसा सुमारे २१ मद्यपिंसह १६ दुचाकीस्वारांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली.वाहतूक पोलिस निरिक्षक गोविंद गंभीरे यांनी यासंदर्भात माहिती देतांना सांगितले की, गुरुवारी रात्री काही दुचाकींसह रिक्षा चालक व अन्य वाहनचालक मद्य पिऊन गाडी चालवतांना आढळले, त्यांच्यावर शहरात ठिकठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यापैकी काहींनी डिपॉझीट भरले तर काहींनी ते न भरल्याने त्यांच्या गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ज्यांनी डिपॉझीट भरले त्यातून १० हजार रुपयांची दंडात्मक रक्कम जमा झाली असल्याचेही ते म्हणाले. ताब्यात असलेल्या गाड्या पोलिस ठाण्याच्या आवारात असल्याचे सांगण्यात आले.वाहतूक पोलिसांची नजर चुकवत दुचाकीवर तिघांना घेऊन वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे या अंतर्गतही सुमारे १६ जणांवर कारवाई करण्यात आली असून शुक्रवारी दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले.ड्रंक अँड ड्राइव्हच्या कारवाईमुळे मद्य पिऊन वाहन चालवणा-यांवर आळा बसण्यास सहाय्य होते. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन वाहन चालवणा-यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याने शहरात वाहन नियमांबाबत आपोआप जनजागृतीही होते. या कामी पोलिसांना ईगल ब्रिगेड फाऊंडेशनच्या सुमारे १५ स्वयंसेवकांनी विविध ठिकाणी सहाय्य केले. वाहतूक पोलिसांनी त्या संस्थेच्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण