शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

‘साहेबां’च्या स्मृतिदिनी बालेकिल्ल्यात शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 01:17 IST

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे शहराचे नाते तसे अतूट आहे. शिवसेनेला पहिली सत्ता या शहराने दिली. यामुळे ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’, अशा शब्दांत ठाण्यातील शिवसैनिक सार्थ अभिमान व्यक्त करतात.

ठाणे : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे शहराचे नाते तसे अतूट आहे. शिवसेनेला पहिली सत्ता या शहराने दिली. यामुळे ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’, अशा शब्दांत ठाण्यातील शिवसैनिक सार्थ अभिमान व्यक्त करतात. मात्र, बाळासाहेबांच्या पाचव्या स्मृतिदिनी शहरातील काही मोजके चौक वगळता त्यांना अभिवादन करणारी होर्डिंग्ज, बॅनर्स शहरात कुठेच दिसले नाहीत आणि कार्यक्रमांचाही गाजावाजा झाला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.प्रमुख चौक, वाहतूक जंक्शनसह प्रमुख होर्डिंग्जची ठिकाणे अतिक्रमणांनी व्यापली म्हणून की काय किंवा फेरीवाल्यांचा समाचार घेण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या उद्या (शनिवार) च्या सभेची ‘सर्व प्रश्नांचे एकच उत्तर मनसे,’ अशी गर्जना करणारी होर्डिंग्ज आणि बॅनर्स लागल्याने शिवसेनेला बाळासाहेबांबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याकरिता ठाण्यात जागाच उपलब्ध झाली नाही की काय, असा सवाल केला जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी व स्मृतिदिनी ठाणेकर शिवसैनिकांकडून दरवर्षी ठिकठिकाणी होर्डिंग्ज व पोस्टर्स लावली जातात. चौकाचौकांत आकर्षक भावमुद्रा असलेली आकर्षक होर्डिंग्ज दिसतात. विविध कार्यक्रम आयोजिले जातात. मात्र, यंदा ना होर्डिंग्ज दिसली ना वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे जाणवले. ठाणे महापालिकेवर पहिल्यांदाच शिवसेनेची स्वबळावर सत्ता आली आहे. त्यामुळे यंदा ठाण्यात बाळासाहेबांचा स्मृती दिन विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा होईल, अशी ठाणेकर शिवसैनिकांची अपेक्षा होती. महापालिकेतील सर्व नगरसेवक, शहरातील तीन आमदार, खासदार, पालकमंत्री, अशा रथीमहारथींचे पाठबळ त्याला मिळेल, अशी भावना होती. परंतु, महापालिका मुख्यालयात बाळासाहेबांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून केलेल्या अभिवादनाशिवाय शहरात कोणतेही कार्यक्रम केले नाहीत.

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेthaneठाणेShiv Senaशिवसेना