शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीनंतर लगेचच उखडले पेव्हर ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 03:07 IST

ठाणे : दुरुस्तीसाठी मागील चार दिवसापासून बंद असलेला विटावा सब वे मंगळवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला केला.

ठाणे : दुरुस्तीसाठी मागील चार दिवसापासून बंद असलेला विटावा सब वे मंगळवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, तो खुला होताच बसवलेले पेव्हर ब्लॉक अक्षरश: उखडले गेल्याने आधीच चार दिवस वाहतूक कोंडीत काढणा-या ठाणेकरांवर पुन्हा एकदा तिचा सामना करावा लागला. पेव्हर ब्लॉक उखडले गेल्याने या मार्गावरील वाहतूकही मंदावली होती. चार दिवस ठाणे महापालिकेने केवळ पेव्हर ब्लॉक बसवले असून दुरुस्ती केल्यानंतर पहिल्याच दिवशी ते निघाल्याने या कामाच्या दर्जाविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित राहीले आहे.चार दिवसाचा ब्लॉक घेऊन विटावा सबवेची दुरु स्ती करण्यात आली. मात्र, सिमेंट काँक्रिटीकरण न करता या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. येथील वाहतूककोंडी ही अनेक वर्षांपासूनची आहे. असे असताना सब वे खाली पडलेले खड्डे बुजविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिसूचना काढून तो चार दिवसांसाठी बंद करून दुरु स्तीचे काम सुरू केले होते. या ठिकाणी पाणी साचत असल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे होतात. कायम अवजड आणि लहान वाहनांची वाहतूक सुरूच राहत असल्यामुळे दुरु स्तीसाठी हा रस्ता बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. हे काम महापालिकेने मंगळवारी संपवून सकाळी सहा वाजता सब वे वाहतुकीसाठी सुरू केला. मात्र, काहीच तासातच पेव्हर ब्लॉक उखडले गेल्याने या भागात वाहतूककोंडी सुरू झाली.या सबवे चे हे काम सुरू असताना या ठिकाणी राहत असलेले मनसे पदाधिकारी यांनी ठाणे महानगर पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला एक पत्र २२ डिसेंबर ला देऊन दुरु स्ती ही सिमेंट काँक्रिटीकरणाने करावी, न्यायालयाच्या बंदीचे आदेश असलेले पेव्हर ब्लॉक वापरू नयेत असे पत्र दिले होते. तरीही प्रशासनाने दुरु स्तीसाठी पेव्हर ब्लॉकचाच वापर केला. यामुळे आता दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मनसे पदाधिकारी सुशांत सुर्यराव आणि भाजप पधाधिकारी मनोहर सुखदरे यांनी केली आहे. यावेळी अधिकारी आणि सुखदरे यांच्यात वादही झाला. नंती त्यांना कळवा पोलीस ठाण्यात नेऊन काही वेळाने सोडण्यातदेखील आले. दरम्यान दुपारी येथील वाहतूक कमी झाल्यानंतर दीड तासाचा पुन्हा ब्लॉक घेऊन दुरुस्तीचे काम पुन्हा सुरू होते. परंतु, आता कामाबाबत मात्र पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.ज्या ठेकेदाराने हे काम केले त्याच्या इतर ठिकाणच्या कामांचीही चौकशीचीमागणीहोतआहे.