शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नाथानींच्या राजीनाम्याने पाटलांचा ‘विजय’ नक्की, उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या खेळीने भाजपत फूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 02:00 IST

Ulhasnagar News : स्थायी समिती सभापतीपदाकरिता भाजपच्या विजय पाटील यांना उमेदवारी देतानाच मंगळवारी भाजपचे सदस्य डॉ. प्रकाश नाथानी यांना समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास भाग पाडून शिवसेनेला बहुमताकडे घेऊन जातानाच पाटील यांचा विजय निश्चित केला.

- सदानंद नाईक उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत भाजपचे बहुमत असतानाही शहराच्या आर्थिक नाड्या शिवसेनेच्या हाती येणार आहेत. स्थायी समिती सभापतीपदाकरिता भाजपच्या विजय पाटील यांना उमेदवारी देतानाच मंगळवारी भाजपचे सदस्य डॉ. प्रकाश नाथानी यांना समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास भाग पाडून शिवसेनेला बहुमताकडे घेऊन जातानाच पाटील यांचा विजय निश्चित केला. यापूर्वी महापौर, उपमहापौरपद भाजपकडून हिसकावून घेणाऱ्या शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रचलेल्या व्यूहरचनेचे हे यश आहे.उल्हासनगर महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना महापौर व उपमहापौर निवडणुकीत शिवसेना आघाडीने बाजी मारली. स्थायी समिती सभापतीपद भाजपकडे असल्याने आता शिवसेना कोणती खेळी करणार, याकडे लक्ष लागले होते. स्पष्ट बहुमत असलेला भाजप कुठल्याही परिस्थितीत स्थायी समिती हातून जाऊ देणार नाही, अशी अपेक्षा होती. स्थायी व प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक गुरुवारी होणार असून स्थायी समिती सभापतीपद खेचण्यासाठी शिवसेनेने भाजपचे समिती सदस्य फोडले. समिती सभापती पदासाठी भाजपकडून जया माखिजा व राजू जग्याशी यांनी तर शिवसेनेकडून भाजपचे समिती सदस्य विजय पाटील यांनी अर्ज दाखल केले. पाटील यांच्या अर्जावर शिवसेना सदस्यांनी सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली.

असे आहे स्थायी समितीमधील पक्षीय बलाबल स्थायी समितीच्या एकूण १६ सदस्यांपैकी भाजपचे ९, शिवसेना ५ व रिपाइं व राष्ट्रवादीचे प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपच्या पाटील यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केल्याने समितीमध्ये भाजप व शिवसेना आघाडीचे प्रत्येकी ८ सदस्य झाले. अशा परिस्थितीत चिठ्ठी काढून सभापतीपदाची निवड झाल्यास भाजपचा सभापती होण्याचा धोका असल्याने मंगळवारी भाजपचे नाथानी यांनी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता शिवसेनेचे बहुमत झाले आहे. गेले दोन दिवस खा. शिंदे हे उल्हासनगरात तळ ठोकून बसले होते. शिवसेना खा. शिंदे यांना निवडून आणण्यासाठी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. भाजप-शिवसेनेची युती महापालिकेत कित्येक वर्षे सत्तेत होती. मात्र आता शिंदे व कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी फोडाफोडी करून स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा विश्वास गमविला आहे. शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली आहे.    - जमनुदास पुरस्वानी, उल्हासनगर शहराध्यक्ष, भाजप 

गुरुवारी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना समर्थक विजय पाटील यांचा विजय निश्चित आहे. भाजपला आपले सदस्य सुरक्षित ठेवता येत नसल्यास ती त्यांची चूक आहे. महापौर व उपमहापौरपद शिवसेना महाआघाडी यांच्याकडे असून आता स्थायी समिती सभापती पदासह प्रभाग समिती सभापतीपदही शिवसेना प्रणीत आघाडीकडे येणार आहे.    - गोपाळ लांडगे, कल्याण जिल्हाप्रमुख, शिवसेना सभागृह नेतेपदी भरत गंगोत्री, महासभेत निवड घोषित  उल्हासनगर : महापालिका सभागृह नेतेपदी राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांची मंगळवारच्या महासभेत पिठासीन अधिकाऱ्यांनी निवड घोषित केली. त्यापूर्वी शिवसेनेचे राजेंद्र चौधरी यांनी सभागृह नेतेपदाचा राजीनामा दिला. ओमी टीम समर्थक नगरसेवक शिवसेनेकडे आल्याने शिवसेनेचे पारडे जड झाल्याचे चित्र आहे.उल्हासनगर महापालिका स्थायी व विशेष समिती सभापती पदावरून शहरातील राजकीय समीकरण बदलले आहे. शिवसेना आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला खूश करण्यासाठी प्रभाग समिती क्र. ४ च्या सभापतीपदी काॅँग्रेसच्या अंजली साळवे यांना शिवसेनेने बिनविरोध निवडून आणले. तर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना सभागृह नेते पदाचा राजीनामा द्यायला लावून राष्ट्रवादी पक्षाचे भरत गंगोत्री यांच्या गळ्यात गटनेतेपदाची माळ घालण्यात आली.उल्हासनगरचे महापौरपद शिवसेनेकडे तर उपमहापौरपद रिपाइंकडे आहे. प्रभाग समिती क्र. ३च्या सभापतीपदी भाजपतील ओमी कलानी टीम समर्थक शुभांगी निकम यांना शिवसेनेने बिनविरोध निवडून आणले. इतर प्रभाग समिती क्र. १ व २च्या सभापती पदीही शिवसेनेचे उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा चौधरी यांनी केला.

विधानसभेत कलानींना उमेदवारी नाकारणे पडले महागमहापालिका निवडणुकीत भाजपने शिवसेनेला डावलून महापौर पदासाठी ओमी कलानी टीमसोबत महाआघाडी केली. बहुमतासाठी स्थानिक साई पक्षाला सोबत घेऊन महापौरपदी मीना आयलानी निवडून आल्या. त्यानंतर महापौर पदावरून भाजप विरुद्ध ओमी कलानी असा वाद सुरू झाला.विधानसभेची उमेदवारी दिली नसल्याने निषेधार्थ ओमी कलानी समर्थक नगरसेवकांमध्ये भाजपविषयी रोष होता. त्यांनी शिवसेनेच्या लीलाबाई अशान यांना मतदान करून महापौरपदी निवडून आणले. तेव्हापासून उल्हासनगरात बहुमत असूनही भाजपला गळती लागली. स्थायी व प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत आता शिवसेनेने भाजपत फूट पाडली. महापौर निवडणुकीत साई पक्षाचे १० नगरसेवक भाजपत सामील झाले होते. त्यापैकी काही भाजपतून बाहेर पडण्याचा मन:स्थितीत असल्याचेही बोलले जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरPoliticsराजकारणthaneठाणे