शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

रुग्णांना मिळाला पीएनआर नंबर; प्रत्येकाची माहिती आता एका क्लिकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 00:47 IST

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची माहिती आता येथील डॉक्टरांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची माहिती आता येथील डॉक्टरांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. शिवाय, रुग्णांना आता केसपेपर काढण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहण्याची गरजही राहणार नाही. पालिकेने कळवा रुग्णालयाचे संगणकीकरण करण्याचे काम हाती घेतले असून त्यासाठी उपचारासाठी आतापर्यंत आलेल्या तब्बल तीन लाख ३३ हजारांहून अधिक रुग्णांना आता पेशंट रिलेशन नंबर (पीएनआर) उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ज्यांची नोंदणी या माध्यमातून झाली आहे, त्या प्रत्येक रुग्णाची माहिती एका क्लिकवर डॉक्टरांना उपलब्ध झाली असून या रुग्णांवर उपचार करणे त्यामुळे सुलभ झाले आहे. विशेष म्हणजे रु ग्णांनी या नंबरशी आपला आधार नंबरदेखील लिंक केला असल्याने रुग्णांची ओळख पटवणे अधिक सोपे झाले आहे.यापूर्वी केसपेपर काढण्यासाठी रुग्णाला तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते. त्यानंतर, त्या रुग्णावर उपचार करताना त्याला आधी कोणता आजार होता का, त्यावर काय उपचार केले आदी माहिती घेताना डॉक्टरांचा वेळ जात होता. परंतु, आता केवळ एका क्लिकवर, एका कार्डवर रुग्णाचा पूर्वेतिहास डॉक्टरांना उपलब्ध होणार आहे. कळवा रु ग्णालयाचा संपूर्ण कारभारच आता डिजिटल झाला असून सेवांचा विस्तारही हळूहळू केला जाणार आहे. केवळ रु ग्णालयाचा कारभारच डिजिटल होणार नसून हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाºया प्रत्येक विद्यार्थ्याचे रेकॉर्डदेखील या प्रणालीच्या माध्यमातून ठेवले जाणार आहे. पालिकेने आणलेल्या हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम या नव्या प्रणालीमुळे या सर्व गोष्टी शक्य झाल्या असून या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १४ कोटी रुपये आहे.कळवा रुग्णालयात शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांतून रोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णालयावर जेवढा उपचार करण्याचा ताण आहे, तेवढाच ताण रुग्णांची माहिती नोंदवणे, पेपरवर्क करणे, अशा स्वरूपाचा आहे. केसपेपर काढण्यासाठी रुग्णाचा किंवा त्याच्या नातेवाइकाचा एक ते दोन तासांचा वेळ जातो. त्यानंतर संबंधित विभागाच्या डॉक्टरकडे रुग्णाला पाठवल्यानंतर त्या डॉक्टरला रुग्णाचा पूर्वेतिहास विचारायला बराच वेळ लागत असल्याने यासाठी रुग्णाचे पाच ते सहा तास वाया जातात. आता पालिकेच्या नव्या प्रणालीमुळे या सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत. केवळ एका कार्डवर हॉस्पिटलमध्ये येणाºयारु ग्णांची संपूर्ण माहिती आता उपलब्ध होत आहे. या प्रणालीमध्ये हॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम, स्टुडंट लाइफसायकल मॅनेजमेंट सिस्टीम आणि पिक्चर अर्कायविंग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन सिस्टीम या तीन गोष्टींवर संपूर्ण हॉस्पिटलचा कारभार चालणार आहे.स्टुडंट लाइफसायकल मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून राजीव गांधी मेडिकलमध्ये शिक्षण घेणाºया सर्व विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. यामध्ये क्लासरूम, लॅबमधील उपस्थिती या सर्व गोष्टींचा ट्रॅक ठेवणे शक्य होणार आहे.रुग्णाची माहिती कुठूनही पाहता येईलहॉस्पिटल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम ही वेबबेस आधारित प्रणाली असल्याने कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रु ग्णाची ही माहिती संबंधित डॉक्टरांना पाहता येणार आहे. रु ग्ण रक्ततपासणी किंवा एक्स रे काढण्यासाठी गेल्यानंतर त्याचे डिजिटल रेकॉर्ड लगेच डॉक्टरकडे उपलब्ध होतील.पिक्चर अर्कायविंग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन सिस्टीमद्वारे जलदगतीने रिपोर्टची इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देवाणघेवाण करता येणार आहे. यासाठी हार्डकॉपी येण्याची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे रु ग्णांवर काय उपचार करावे, याचा अभ्यास डॉक्टरांना करता येणार आहे.

टॅग्स :thaneठाणे