शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

रुग्ण दुपटीचा कालावधी ३२३ दिवसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:41 IST

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. यापूर्वी रुग्णवाढीचा वेग १.५७ टक्क्यांवर होता. तो ...

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. यापूर्वी रुग्णवाढीचा वेग १.५७ टक्क्यांवर होता. तो आता ०.२५ टक्क्यांवर आला असून, रुग्ण दुपटीचा कालावधी हा महिनाभरात ५२ दिवसांवरून थेट ३२३ दिवसांवर गेल्याने ठाणेकरांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब म्हणावी लागणार आहे. त्यातही मृत्यूदर रोखण्यातही महापालिकेला यश आले असून, सध्या तो १.४४ टक्क्यांवर आला आहे, तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे रुग्णवाढीपेक्षाही अधिक असल्याचे दिसून आले आहे.

ठाणे महापालिका हद्दीत आतापर्यंत एक लाख २६ हजार ६८७ करोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी एक लाख २१ हजार ४१३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचे प्रमाण ९५.८४ टक्के इतके आहे. आतापर्यंत १८३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर सध्या प्रत्यक्षात शहरात ३ हजार ४४४ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यातील १११९ रुग्णांना सौम्य लक्षणे असून, १८६२ रुग्णांना कोणत्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत. ४६३ रुग्ण क्रिटिकल असून, २९३ आयसीयू आणि १७० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. महिनाभरापूर्वी म्हणजेच १६ एप्रिल रोजी शहरात प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १६ हजार ५ इतकी होती. त्यावेळेस रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के इतके होते; परंतु गेल्या महिनाभरात महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे संसर्ग कमी झाला असून, रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ होऊन ते आता ९५.८४ टक्के झाले आहे. दुसरीकडे रुग्ण दुपटीच्या कालावधीतदेखील कमालीचा फरक पडला आहे. १६ एप्रिलला हा कालावधी ५२ दिवसांवर होता. महिनाभरात तो आता ३२३ दिवसांवर आला आहे.

तसेच मागील महिनाभरात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा अधिक असल्याचेही दिसून आले आहे. गेल्या १० दिवसांत शहरात तीन हजार ४४९ नवे रुग्ण आढळले असले तरी याच कालावधीत दुप्पट रुग्णांनी म्हणजेच ६ हजार ७६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

तारीख -नवे रुग्ण -बरे झालेले रुग्ण

०९ मे - ४७९ - ९६१

०९ मे - ४०६ - ८५३

१० मे - ३८८ - ६८५

११ मे - २९० - ७२३

१२ मे - ४०९ - ७४६

१३ मे - ३३९ - ५०८

१४ मे - ३२५ - ५४७

१५ मे - ३०६ - ७०६

१६ मे - २७४ - ५९६

१७ मे - २३३ - ४३७

----------------------

एकूण- ३४४९- ६७६२