शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराविना रुग्णाचा उल्हासनगरमध्ये मृत्यू, कुटुंबीयांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 00:20 IST

उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहण-या ५७ वर्षीय व्यक्तीला मंगळवारी रात्री श्वसनाचा त्रास सुरु झाला.

उल्हासनगर : श्वसनाचा त्रास होणाऱ्या एका रुग्णाचा उपचाराविना बुधवारी मृत्यू झाला. तीन तास शहरात फिरून नामांकित रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे.उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरात राहण-या ५७ वर्षीय व्यक्तीला मंगळवारी रात्री श्वसनाचा त्रास सुरु झाला. ओळखीच्या डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला मुलाला व कुटुंबाला दिला. डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी घेऊन मुलगा शहरातील नामांकित रुग्णालयात गेला. मात्र, रुग्णालयाने बेड नसल्याचे सांगून उपचारास नकार दिला. अखेर, एका मित्राच्या ओळखीने बुधवारी सकाळी डोंबिवलीच्या एका रुग्णालयात नेण्यात आले. तेथे काही वेळ उपचार केल्यावर, रुग्णालयाने बेड रिकामा नसल्याचे सांगून उल्हासनगरमध्ये परत पाठवले. वाटेतच त्या रुग्णाचा मृत्यू झाला. मृतदेह घेऊन मध्यवर्ती रुग्णालयात गेले असता, कोणतीही चाचणी न करता रुग्णालयाने कोरोना संशयित म्हणून जाहीर करून तसे प्रमाणपत्र दिले. मृतदेह परस्पर स्मशानभूमीत नेऊन अंत्यसंस्कार करावे लागल्याची माहिती त्या रुग्णाच्या मुलाने पत्रकारांना दिली. अशी वेळ इतरांवर येऊ नये, असे या मुलाने सांगितले. रुग्णालयात संशयित रुग्णावर उपचार झाल्यास अनेकांचे प्राण वाचतील. अचानक श्वसनाचा त्रास झाल्यावर उपचारासाठी रुग्णालयात नेल्यावर, रुग्णालय सुरुवातीला कोरोनाचा अहवाल मागतात. मुळात कोरोनाचा अहवाल लगेच मिळतो का? अहवाल नसल्याने उपचार केले जात नसल्याने अनेकांचे बळी जात आहेत.>रेडक्रॉस रुग्णालयातही सावळागोंधळ कायमया घटनेबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले की, संबंधित रुग्णाला रेडक्रॉस रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जायला हवे होते. मात्र, प्रत्यक्षात या रुग्णालयात अपुरी सुविधा व सावळागोंधळ असून, याविरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी दिला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस