शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मित्रासोबत शारीरिक संबंधांसाठी छळ, टिटवाळा पोलिसांनी केली पतीसह एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 03:26 IST

टिटवाळा : विवाहितेला तिच्या पतीनेच त्याच्या मित्राबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी छळ केल्याचा प्रकार सांगोडा गावात घडला आहे.

टिटवाळा : विवाहितेला तिच्या पतीनेच त्याच्या मित्राबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी छळ केल्याचा प्रकार सांगोडा गावात घडला आहे. याप्रकरणी विवाहितेने टिटवाळा पोलिसात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पती नितीन पाटील आणि त्याचा मित्र नितीन मोगरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.पीडित महिलेचे २००७ मध्ये सांगोडा येथील नितीन पाटीलशी लग्न झाले. वर्षभरानंतर तो पत्नीला माहेरून पैसे आणण्यासाठी शिवीगाळ करत असत. मात्र, भावाला हृदयविकार असल्याने तिने माहेरी ही बाब सांगितली नाही. २०११ मध्ये तीन मुलांनंतर पतीने तिला प्रकृती सक्षम नसतानाही कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने गोवेली रुग्णालयात नेण्याचा बहाणा करत तिला घराबाहेर नेले. वाटेत मित्र मोगरे याला फोन करून बोलावून घेतले. तेथे मोगरे याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. मात्र तिने विरोध केल्यानंतरही मोगरे याने तिला झाडाझुडपात ओढत नेत अत्याचार केला. या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याचीही धमकी दिली.२०१५ मध्येही पीडित महिला व पाटील एका लग्न समारंभातून गाडीने परतत होते. या वेळी पिसा धरण परिसरात आधीच हजर असलेल्या मोगरे याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. २०१७ मध्येही गणेशोत्सवादरम्यान पाटील याने बाहेर जाण्याचे कारण सांगून तिला निर्जन रस्त्यावर नेले. तेथेही मोगरे याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच सासू, सासरे व नणंद यांनीही किरकोळ कारणावरून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप पीडित महिलेने टिटवाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.>पोलीस कोठडीत रवानगीमहिलेचा पती नितीन पाटील व त्याचा मित्र नितीन मोगरे यांना न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग