शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

गेली 26 वर्षापासून फळेगांवात नवरात्रीत घुमतोय टाळ मृदूंगांचा नाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 18:30 IST

रविवारच्या 29 तारखेला घटस्थापना झाली असून पुढील नऊ दिवस नवरात्र उत्सवाची धामधुम सर्व देशभर सुरु रहाणार आहे

उमेश जाधव

टिटवाळाः- नवरात्र उत्सव म्हंटला की सर्वत्र डिजेच्या तालावर थिरकणारी तरूणाईची पाऊले. दांडियाच्या रासक्रिडेत रममान होऊन झालेली जनता असे चित्र सर्वत्र पहावयास मिळते. परंतु कल्याण तालुक्यातील फळेगांवात जरिमरी मित्रमंडळाच्या नवरात्रो उत्सवात गेली 26 वर्षापासून घुमतोय टाळ मृदूंगाचा गजर ऐकायला मिळतोय. 

रविवारच्या 29 तारखेला घटस्थापना झाली असून पुढील नऊ दिवस नवरात्र उत्सवाची धामधुम सर्व देशभर सुरु रहाणार आहे. डिजेचा कर्कश आवाजावर ताल व ठेका धरून तरूणाईसह, लहानांन पासून अबाल वृध्दांपासून सर्वच गरब्याच्या ठेक्यावर नाचतांना दिसून येतील. परंतु कल्याण तालुक्याच्या फळेगावात मात्र गेला 26 वर्षापासून वेगळेच चित्र पाहावयास मिळते. येथील जरिमरी मित्र मंडळात नवरात्रात दांडिया ऐवजी टाळ मृदूंगाचा आवाज घुमत असतो. येथे रोज भजन, किर्तन, हरिपाठ, प्रवचन अशा प्रकारचे विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. या मंडळाचे विशेष म्हंणजे की सर्व कार्यकर्ते तरूण असून देखील दांडिया ऐवजी धार्मिक कार्यक्रम राबविले जातात. महाराष्ट्रातील नामांवत किर्तनकारांची किर्तने व प्रवचने या ठिकाणी रोज होत आसतात. यंदा देखील फळेगांवातील नवरात्र उत्सवात नऊ दिवस टाळ-मृदूंगाचा नाद घुमणार आहे.

आम्हाला आमच्या तरूण मुलांचा अभिमान आहे. गेली 26 वर्षा पासून आमची मुलं हा कार्यक्रम राबवित आहेत. अशाच प्रकारे हा कार्यक्रम अखंड तेवत रहाणार आहे. आम्ही देखील त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहोत. असे मत मंडळाचे जेष्ठ सल्लागार कमलाकर महाराज व कृष्णा महाराज जाधव यांनी व्यक्त केले.