शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत धोकादायक इमारतीचे तोडकाम सुरू असताना भाग कोसळला; जीवितहानी टळली!

By नितीन पंडित | Updated: June 19, 2024 17:32 IST

सुदैवाने रस्त्यावर कोणी पादचारी अथवा वाहन नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: धोकादायक इमारतीचे पाडकाम सुरू असताना अचानक इमारत कोसळल्याची दुर्घटना बुधवारी घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

शहरातील प्रभाग समिती क्रमांक चार अंतर्गत सोमानगर परिसरात असलेली नारपोली क्रमांक एक भूभाग मधील मालमत्ता क्रमांक ३६ ही धोकादायक इमारत स्वतः इमारत मालकाने बकरी ईद ची सुट्टी असल्याने शनिवार पासून इमारत तोडण्यास सुरवात केली होती.या बाबत पालिका प्रशासनाला कळविण्यात आले नव्हते. बुधवारी या इमारतीचे तोड काम सुरू असताना अचानक इमारतीचा काही भाग रस्त्याच्या बाजूने कोसळला. सुदैवाने रस्त्यावर कोणी पादचारी अथवा वाहन चालक नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर पालिका सहाय्यक आयुक्त सुनील भोईर व आपत्कालीन पथकाचे प्रमुख साकिब खर्बे कर्मचारी पथकासह  घटनास्थळी दाखल झाले.पालिकेने ही इमारत निर्मनुष्य केली होती पण येथील विद्युत पुरवठा सुरू होता.त्यामुळे ही इमारत पाड काम करताना झालेल्या दुर्घटनेस इमारत मालकास जबाबदार धरीत त्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती सहाय्यक आयुक्त सुनील भोईर यांनी दिली आहे. शहरात पावसाळा आला की धोकादायक इमारतींचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येत असतो.

यापूर्वी असंख्य इमारत दुर्घटना या पावसाळ्या च्या सुमाराचे घडलेल्या आहेत.पालिका प्रशासन पावसाळापूर्वी धोकादायक इमारतींची यादी प्रकाशित करून त्या  निर्मनुष्य करून ठेकेदार नेमून तोडण्यात येत आहेत.मात्र अशा इमारती शहरात मोठ्या प्रमाणात उभ्या असून भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडी