शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

सेवा रस्त्यालाही आता सम विषय पार्कींगचा दिला जाणार उतारा, पालिका आणि वाहतुक विभागात उडणार खटके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 16:26 IST

नौपाड्यात वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी जो बदल करण्याचा विचार वाहतुक पोलिसांनी सुरु केला आहे. तोच पी वन, पी टूचा उतारा आता सेवा रस्त्यांच्या बाबतही लागू करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत.

ठळक मुद्देपालिकेचे पिवळे पट्टे येणार अडचणीतकोंडी सोडविण्यासाठी सेवा रस्त्याचा अभ्यास सुरु

ठाणे - सेवा रस्ता अडविणारे गॅरेजवाले आणि शोरुमवाल्यांच्या विरोधात पालिकेने कडक धोरण आखून त्यांच्याकडून १० हजार रुपये दंड आकारण्याचेही निश्चित केले होते. परंतु तरीदेखील येथील रस्ते काही केल्या मोकळे होतांना दिसत नाहीत. त्यामुळे आता ठाणे वाहतुक पोलिसांनी आता यावर उपाय म्हणून येथील कोंडी सोडविण्यासाठी नौपाड्यातीलच पी वन, पी टू चा फॉर्मुला आजमावण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पालिकेने काही रस्त्यांवर पार्कींगसाठीचे पिवळे पट्टे आखले आहेत. परंतु वाहतुक विभागाच्या या हालचालीमुळे पालिका आणि वाहतुक पोलीस यांच्यात यावरुन खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.ठाण्यात हायवे लगत सेवा रस्ते आहेत. मात्र या सेवा रस्त्यांवर दोनही बाजूला वाहतुक कोंडी होत आहे. रस्त्याच्या दोनही बाजूला कशाही पध्दतीने पार्कींग होत आहे. तसेच येथील गॅरेजवाले आणि शोरुम वाल्यांना हे सेवा रस्ते आंदनच दिले की काय अशी परिस्थिती दिसत आहे. त्यांच्या गाड्या फुटपाथपासून थेट रस्त्यापर्यंत लागलेल्या असतात. त्यामुळे वाहतुक कोंडीत आणखीनच भर पडत आहे. या बेकायदा पार्कींग विरोधात महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून यापुर्वी अनेकदा कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर पथक मागे फिरताच या ठिकाणी पुन्हा बेकायदा पार्कींग सुरू होते. या पार्कींगमुळे सेवा रस्ते वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडल्याने तेथील कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक होऊ लागली आहे. विशेष म्हणजे पालिकेने येथील कोंडी सोडविण्यासाठी आता गॅरेज आणि शोरुम वाल्यांच्या विरोधात मोहीम उघडली होती. तसेच कारवाई करुनही येथे वाहने लागल्यास १० हजार रुपये दंडाची तरतुद पालिकेने केली होती. परंतु आतापर्यंत किती गॅरेज आणि शोरुमवाल्यांकडून दंडाची रक्कम वसुल झाली याचा उलघडा न केलेलाच बरा. शिवाय पार्कींग धोरण राबविण्याच्या दृष्टीने पालिकेने काही सेवा रस्त्यांवर पिवळे पट्टे देखील आखले आहेत. परंतु वाहतुक पोलिसांनी सुचविलेल्या नव्या बदलामुळे, पिवळे पट्टे गायब होण्याची शक्यता आहे. वाहतुक विभागामार्फत सेवा रस्त्यांवर पी वन, पी टू पार्कींग करण्याचा विचार सुरु झाला आहे. सेवा रस्त्यांवरील बेकायदा पार्कींगला शिस्त लागावी आणि वाहतूकीसाठी रस्ता मोकळा रहावा यासाठी ही योजना राबविण्याचा विचार असल्याचे वाहतुक विभागाने स्पष्ट केले. सेवा रस्त्यांवर कोणत्या भागात सम-विषम पार्कींग होऊ शकते, त्याठिकाणी किती वाहने उभी राहू शकतात, या पार्कींगमुळे वाहतूकीला अडथळा होणार नाही ना, या सर्वाचा अभ्यास करण्यात येत आहे. परंतु पालिकेने मारलेल्या पिवळ्या पट्यांचे काय करायचे असा पेचही त्यांना सतावत आहे. त्यामुळे वाहतुक विभागाने पी वन, पी टू चा पर्याय येथे राबविला तर पालिका आणि वाहतुक विभाग यांच्यात खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाPoliceपोलिस