शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: लोकमत इम्पॅक्ट: नागरिकांना दिलासा; गोरेगाव ओबेरॉय मॉल येथील पाणी अतिरिक्त पंप लावून काढले
2
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
3
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
4
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
5
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
6
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
7
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
8
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
9
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
10
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
11
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
12
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
13
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
14
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
15
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
16
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
17
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
18
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
19
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
20
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड

पादचारी पुलाच्या वाटेत पार्किंग

By admin | Updated: February 1, 2017 03:15 IST

पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकातील मध्यभागी असलेला पादचारी पूल रेल्वेने दहा वर्षापूर्वी लाखो रुपये खर्चून बांधला. मात्र या पूलावरुन पूर्व व पश्चिमेकडे उतरण्याची वाट

- राजू काळे, भार्इंदरपश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकातील मध्यभागी असलेला पादचारी पूल रेल्वेने दहा वर्षापूर्वी लाखो रुपये खर्चून बांधला. मात्र या पूलावरुन पूर्व व पश्चिमेकडे उतरण्याची वाट रेल्वेनेच बंद केली आहे. दुचाकींच्या पार्किंगमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. दुचाकी वाहनतळामुळे प्रवाशांना वाट काढताना जिकरीचे ठरत आहे. त्यातच उत्तर दिशेला असलेल्या पादचारी पुलावर जाण्याची वाट अरुंद असून त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. शिवाय याच मार्गावरुन दुचाकी ये-जा करतात. मध्यभागी बांधण्यात आलेल्या प्रशस्त पुलाच्या पायऱ्यांजवळच दुचाकीसाठी वाहनतळ सुरु केल्याने रेल्वे प्रशासनाचा उतारा कुचकामी ठरणारा आहे. रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच सुविधा तोकड्या पडत असताना तसेच पुरेशी जागा नसतानाही वाहनतळ सुरु केल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. याउलट ज्या ठिकाणी रेल्वेची वाहनतळासाठी जागा होती, त्या जागेवर एका खाजगी विकासकाला इमारत बांधण्याची परवानगी दिल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी न्यायालयात दावा सादर केला आहे. रेल्वेच्या या भ्रष्ट कारभारामुळे प्रवाशांच्या संतापात भर पडत असून त्याचा केव्हाही उद्रेक होण्याची शक्यता आहे. या वाहनतळ परिसरात पुरेसा उजेड नसल्याने रात्रीच्यावेळी महिला व तरुणींना येथून जाताना असुरक्षित वाटते. आर्थिक तडजोडीतून फेरीवाले बसत असल्याने त्यांना हटवण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असली तरी कारवाईसाठी एकमेकांकडे बोट दाखवली जात आहे. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाशी अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. यंदा मात्र तेथील वाहनतळ विना रहदारीच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे. - देवेंद्र पोरवाल, रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष

हा पूल प्रशस्त असल्याने त्याचा वापर ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांकडून केला जातो. परंतु, पूलाच्या उतरण्याच्या वाटेतच वाहने उभी केली जात असल्याने ये-जा करणे अडचणीचे ठरते. - संपत मोरे, प्रवासी

या पुलाच्या वाटेत उभी करण्यात येणारी वाहने त्वरित हटवून तेथे सुरक्षारक्षक तैनात करावा. तसेच रात्रीच्यावेळी तेथे पुरेशा दिव्यांची व्यवस्था करण्यात यावी. - शालिनी अडसुळे, प्रवासी