शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आई-बाबा मला घरात घ्या, आर्जव करीत पाच तास ताटकळला; बरा झाल्यानंतरही ‘त्याला’ परत आणले मनोरुग्णालयात

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: March 7, 2024 14:42 IST

नाशिक येथील दिंडोरी गावात राहणाऱ्या स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या दशरथला त्याच्या वडिलांनी ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल केले होते. 

ठाणे : ‘आम्ही उद्या आमच्या मुलाला घ्यायला येणारच होतो, तुम्ही कशाला घेऊन आला ? थांबा बाहेर, मी घर स्वच्छ करतो आणि त्याला आत घेतो, असे म्हणत आई-वडिलांनी दाराला आतून कडी लावून घेतली आणि ४६ वर्षांचा दशरथ (नाव बदलले आहे) पाच तास ताटकळत बाहेर उभा राहिला. घर पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता; मात्र आई-वडिलांनी त्याच्या तोंडावरच दार लावून घेतल्याने तो ढसाढसा रडू लागला. नाशिक येथील दिंडोरी गावात राहणाऱ्या स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या दशरथला त्याच्या वडिलांनी ठाणे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी ४ फेब्रुवारी २०२२ रोजी दाखल केले होते. ज्यावेळी उपचाराने दशरथ बरा झाला त्यावेळी त्याला डिस्चार्ज देण्याचा निर्णय मनोरुग्णालयाने घेतला. त्याच्या घरच्यांशी समाजसेवा अधीक्षक सतीश वाघ यांनी संपर्क करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी टाळाटाळ केली. अनेकवेळा संपर्क करूनही मुलास घ्यायला येतो असे उत्तर दिले. शेवटी त्याला घरी नेऊन सोडण्याचे ठरविले. मनोरुग्णालयातून तीन कर्मचारी आणि एक वाहन चालक असे शासकीय वाहनातून त्याच्या घराबाहेर पोहोचले. त्यावेळी दार ठोठावल्यावर वडिलांनी मुलाला पाहताच त्याला घरात घ्यायचे सोडून कर्मचाऱ्यांना उलट प्रश्न करण्यास सुरुवात केली. आई-वडिलांना घट्ट मिठी मारेन, त्यांच्याशी खूप गप्पागोष्टी होतील, असे दशरथला वाटले हाेते. मात्र  आई-वडिलांनी त्याच्या तोंडावरच दार लावून घेतले. 

पोलिसांनाही दिली नाही दाद- दार उघडत नसल्याने संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिस तेथे हजर झाले. त्यांनीही दार उघडण्यास सांगितले असता घरातल्यांनी नकारात्मक प्रतिसाद दिला. - पाच तास प्रयत्न करूनही दार उघडत नसल्याने कर्मचारी, पोलिस आणि दशरथच्या लक्षात आल्याने त्याला मनोरुग्णालयात परत नेण्याचा निर्णय घेतला. घरातलेच स्वीकारत नसल्यामुळे रुग्णालयासमोर त्याला परत आणण्याशिवाय पर्याय नव्हता, अशी माहिती सतीश वाघ यांनी दिली. 

कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावलेपोटच्या लेकरालाच आई-वडिलांनी नाकारले आणि तोंडावरच दार लावून घेतले हे दृश्य पाहणाऱ्या मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांतही अश्रू आले. ही घटना ऐकल्यावर वैद्यकीय अधीक्षक, समाजसेवा अधीक्षकही खूप भावुक झाले.

नातेवाईक असूनही अशा रुग्णांना नाईलाजाने पुनर्वसन केंद्रात पाठवावे लागते, याचे दु:ख वाटते. समाजातील माणुसकी कमी झाली की काय असा प्रश्न पडू लागतो.- डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय 

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल