शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या खाजगी शाळेत शिक्षकांना पालकांची धक्काबुक्की 

By धीरज परब | Updated: October 20, 2022 23:41 IST

रस्त्यावर थांबवण्या पेक्षा पालकांना पाल्यांसह आत उभे राहू द्या ह्या मुद्द्यावरून भाईंदरच्या पोरवाल शाळेतील शिक्षकांना संतप्त पालकांच्या धक्काबुक्कीला सामोरे जावे लागले.

मीरारोड - 

रस्त्यावर थांबवण्या पेक्षा पालकांना पाल्यांसह आत उभे राहू द्या ह्या मुद्द्यावरून भाईंदरच्या पोरवाल शाळेतील शिक्षकांना संतप्त पालकांच्या धक्काबुक्कीला सामोरे जावे लागले. या घटने नंतर पोलिसांनी शाळेला समजपत्र पत्र पाठवले असून दुसरीकडे पालकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोरवाल शाळेच्या आवारातील संतप्त पालक व शिक्षकांच्या धक्काबुक्कीचा व्हिडीओ  व्हायरल झाला होता. पालकांच्या सांगण्या नुसार, पोरवाल शाळेचे प्रवेश द्वार हे मुख्य रस्त्यावर असून रस्ता अरुंद आहे. सकाळी ११ च्या सुमारास शाळेच्या बस विद्यार्थ्यांना घेऊन येतात त्यावेळी शाळेत मुलांना सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांना मुलांना घेऊन रस्त्यावरच थांबावे लागते. त्यावेळी खूप गर्दी होते जेणे करून रस्त्यावरून ये - जा करणाऱ्या वाहनां मुळे अपघाताची भीती असते. त्यामुळे पालकांना मुलांसह बाहेर रस्त्यावर न थांबवता आतील मैदानाच्या कडेला उभे राहू द्या अशी पालकांची मागणी होती. 

शाळा प्रशासन दाद देत नसल्याची भावना झालेल्या पालकांनी सोमवार १७ रोजी विचारणा करण्यासाठी शाळेत शिरले . त्यावेळी महिला पालकांना अडवण्याचा प्रयत्न काही महिला शिक्षकांनी केला असता त्यांच्यात बाचाबाची व धक्काबुक्की झाली.  भाईंदर पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुगुट पाटील सह पोलीस पथक शाळेत दाखल झाले व शांतता निर्माण केली. 

दरम्यान शाळा शिक्षिकेच्या तक्रारी नंतर काही पालकांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे . तर भाईंदर पोलिसांनी शाळा व्यवस्थापनास खरमरीत पत्र पाठवून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला महत्व देण्याची  भूमिका मांडत पालकांशी सौजन्याने वागावे व चर्चेने त्यांच्या समस्यांवर तोडगा काढावा. जेणे करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याचे कळवले आहे. 

शाळा व्यवस्थापनाचे विनोद तिवारी म्हणाले कि, शाळेच्या ठरलेल्या वेळे आधी काही पालक खूप लवकर येतात. त्यामुळे त्यांना बाहेर थांबावे लागते त्यावरून समस्या उद्भवली होती. पण  पालक व व्यवस्थापनाने सामंजस्याने त्यावर तोडगा काढला आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर