शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

गुटखा, सिगारेट, ऑनलाइन जुगारची जाहिरात करणाऱ्यांवर बहिष्कार टाकण्याची विद्यार्थ्यांसह पालकांनी घेतली शपथ

By नितीन पंडित | Updated: February 12, 2024 16:56 IST

गुटखा सिगरेट यांच्या प्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी असली तरी अप्रत्यक्षपणे त्याची जाहिरात करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविल्या जातात.

नितीन पंडितभिवंडी : गुटखा सिगरेट यांच्या प्रत्यक्ष जाहिरातींवर बंदी असली तरी अप्रत्यक्षपणे त्याची जाहिरात करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढविल्या जातात. त्यामुळे अशा जाहिराती सर्रासपणे टिव्ही वर सुरू असतात.चित्रपट अभिनेते हे गुटखा सिगारेट यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून युवा वर्गाला आकर्षित करीत असतानाच मोबाईल वरील ऑनलाईन जुगाराच्या जाहिराती अनेक खेळाडू करीत आहेत. त्याकडे युवावर्ग मोठ्या संख्येने आकर्षित होऊन जुगार व नशेच्या विळख्यात अडकत आहेत.युवा वर्गाला या पासून परावृत्त करण्यासाठी भिवंडी तालुक्यातील पडघा येथील तुळशीराम पाटील इंग्लिश मिडीयम शाळेच्या रौप्य महोत्सवी स्नेह संमेलनात संस्थाध्यक्ष कुंदन पाटील यांनी विद्यार्थी,पालक,शाळेतील शिक्षक यांनी कार्यक्रमा दरम्यान गुटखा सिगारेट यांचे सेवन करणार नाही तसेच ऑनलाईन जुगार खेळणार नाही अशी शपथ घेतानाच अशा वस्तूंची जाहिरात करणाऱ्या चित्रपट अभिनेते यांचे चित्रपट पाहणार नाही तर ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणाऱ्या खेळाडूंचा खेळही पाहणार नाही अशी शपथ घेतली.याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी शशिकांत तांबोळी,अविनाश महाजन,शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्याच्या युगात गुटखा सिगारेट यांच्या व्यसनाचे प्रमाण वाढले असताना,मोबाईल वरील ऑनलाईन जुगार खेळल्याने अनेक युवक भरकटले गेले आहेत.अनेक युवकांनी जुगारात पैसे हरल्याने आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत तर अनेक जण त्यामुळे चोरीच्या मार्गाला लागले आहेत.हे कुठे तरी थांबणे गरजेचे आहे.त्यामुळे शाळेचा रौप्य महोत्सव साजरा करताना शिक्षक पालक विद्यार्थी यांच्या उपस्थितीत या विरोधात अशा जाहिराती करणारे अभिनेते यांचे चित्रपट व खेळाडू यांचे कार्यक्रम न पाहण्याची शपथ घेतली असून त्यातून काही प्रमाणात का होईना आम्ही यशस्वी झालो तर हा उपक्रम सार्थकी लागेल अशी प्रतिक्रिया कुंदन पाटील यांनी दिली आहे.संस्थेच्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थित पालक विद्यार्थ्यांसह सर्वांनी स्वागत करीत प्रतिसाद दिला आहे.तसेच सध्या हि शपथ तालुक्यात चर्चेचा विषय बनली असून या निर्णयाचा सर्वच स्थरातून स्वागत करण्यात येत आहे.