शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

२२९७ बालकांच्या आरटीई प्रवेशास पालकांचा विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:09 IST

शनिवारपर्यंत मुदत : लवकर प्रवेश घेण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

ठाणे : मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांचे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या जिल्ह्यातील शाळांमध्ये आतापर्यंत तीन हजार ५९७ विद्यार्थ्यांचे प्रवेश केजी ते पहिलीच्या वर्गात झाले. मात्र, निवड झालेल्या उर्वरित दोन हजार २९७ विद्यार्थ्यांचे प्रवेश त्यांच्या पालकांच्या निष्काळजीपणामुळे आरटीईचे शालेय प्रवेश रखडले आहेत. त्यास अधिक विलंब न करता ४ मे पर्यंत या बालकांचे प्रवेश घेण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील ६५२ शाळांमधील प्रवेशासाठी आरटीईद्वारे पाच हजार ८९६ बालकांची निवड पहिल्या फेरीत झाली आहे. यातील तीन हजार ५९७ बालकांचे प्रवेश झाले. मात्र, पालकांच्या दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे दोन हजार २९७ शालेय प्रवेश रखडले आहेत. या प्रवेशासाठी आता ४ मे ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधित पालकांनी त्यांना दिलेल्या शाळांमध्ये त्यांच्या बालकांचे केजी ते पहिलीच्या वर्गात त्वरित प्रवेश घेण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.

एससी, एसटी प्रवर्गांसह आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांमधील बालकांना शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जात आहे. यासाठी ६५२ खाजगी शाळांमध्ये यंदा १३ हजार ४०० प्रवेश आरटीई कायद्याखाली आरक्षित ठेवले आहेत. त्यासाठी १६ हजार ३२६ बालकांनी केजी ते पहिलीच्या वर्गांसाठी प्रवेश अर्ज दाखल केले आहेत.त्यातून लॉटरी सोडतीच्या पहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली आहे.

652 शाळांमधील प्रवेशासाठी आरटीईद्वारे पाच हजार ८९६ बालकांची निवड पहिल्या फेरीत झाली आहे. यातील तीन हजार ५९७ बालकांचे प्रवेश झाले. मात्र, पालकांच्या दुर्लक्ष व निष्काळजीपणामुळे दोन हजार २९७ शालेय प्रवेश रखडले आहेत. पालकांच्या निष्काळजीमुळे रखडलेले बालकांचे प्रवेश

शहराचे नाव रखडलेले प्रवेशअंबरनाथ १७९भिवंडी मनपा २०५भिवंडी ३४कल्याण ८३कल्याण-डोंबिवली मनपा २५५मीरा-भाईंदर ०२४मुरबाड ००८नवी मुंबई ७१७शहापूर ११३ठाणे मनपा-१ २३३ठाणे मनपा-२ ३७१उल्हासनगर ०७५

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाSchoolशाळा