शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा समाजशास्त्र विषयाचा पेपर फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 06:06 IST

दहावीची परीक्षा सुरू असतानाच सोमवारी सकाळी ९.३०च्या सुमारास इंग्रजी माध्यमाच्या समाजशास्त्र विषयाचा पेपर मोबाइलवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.

कल्याण : दहावीची परीक्षा सुरू असतानाच सोमवारी सकाळी ९.३०च्या सुमारास इंग्रजी माध्यमाच्या समाजशास्त्र विषयाचा पेपर मोबाइलवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.दहावीच्या इंग्रजी माध्यमाच्या समाजशास्त्र विषयाचा पेपर सोमवारी सकाळी होता. परीक्षार्थी परीक्षा देण्याची तयारी करत असताना ९.४५च्या सुमारास कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात राहणाऱ्या शिक्षिका मेघा बागोरे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर समाजशास्त्र विषयाच्या पेपरची प्रश्नपत्रिका आली. ज्या नंबरवरून प्रश्नपत्रिका आली, त्यावर फोन केला. त्या वेळी समोरील व्यक्तीने त्यांना सांगितले की, हा पेपर माझ्या मुलाकडून तुम्हाला चुकून पाठवला गेला आहे. त्यानंतर, त्याने हा मेसेज त्वरित डीलीट केला. त्यानंतर बागोरे यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

टॅग्स :examपरीक्षा