शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चरस तस्करी प्रकरणी ठाण्यातील पानटपरी चालकाला दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 23:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : तब्बल दोन लाख ८० हजारांचे दोन किलो ८०० ग्रॅम वजनाच्या चरस तस्करीप्रकरणी ठाण्यातील अशोक ...

ठळक मुद्दे ठाणे विशेष न्यायालयाचा आदेश एक लाखांच्या दंडाचीही शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तब्बल दोन लाख ८० हजारांचे दोन किलो ८०० ग्रॅम वजनाच्या चरस तस्करीप्रकरणी ठाण्यातील अशोक जैसवार (३९, रा. रामनगर, ठाणे) या पानटपरी चालकाला दहा वर्षाच्या सश्रम कारावासाची आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा तथा विशेष न्यायाधीश हेमंत पटवर्धन यांनी मंगळवारी सुनावली आहे. तसेच दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.ठाणे रेल्वे स्थानकाजवळील फलाट क्रमांक एकच्या बाजूला असलेल्या दादा पाटीलवाडीमध्ये जैसवार या पान टपरी चालकाकडे चरस विक्री होत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझडे यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने सापळा लावून १९ एप्रिल २०१५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास जैसवार याला ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याने बेकायदेशीररित्या बाळगलेला दोन किलो ८०० ग्रॅम वजनाचा चरस त्याच्याकडून हस्तगत केला होता. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध नार्कोटीक ड्रग्ज अ‍ॅन्ड सायकोट्राफीक सबस्टन्सेस अ‍ॅक्ट अ‍ॅन्ड रुल्स (एनडीपीएस) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. तेंव्हा पासून तो न्यायालयीन कोठडीत होता. नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि अविनाश सोंडकर यांनी या प्रकरणाचा न्यायालयात पाठपुरावा केला होता. पैरवी अधिकारीम्हणून जमादार चौगुले यांनी काम पाहिले. यामध्ये पाच साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील वर्षा चंदने यांनी आरोपीला शिक्षा मिळण्यासाठी जोरदार सरकारी पक्षाची जोरदार बाजू मांडली.* अंमली पदार्थाच्या गुन्हयामध्ये ठाणे न्यायालयाने पहिल्यांदाच इतक्या मोठया दंडाची शिक्षा सुनावल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय