शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात १९ लाखांचे दागिने लुबाडणारा अटकेत: मंत्री पंकजा मुंडे यांचा नातेवाईक असल्याची बतावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:14 IST

कार विक्री प्रकरणात साडे पाच लाखांचा गंडा घालणाऱ्या गजानन पालवे याला नौपाडा पोलिसांनी सराफाची १९ लाखांना फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. राज्याच्या मंत्रि पंकजा मुंडे - पालवे यांचा नातेवाईक असल्याची बतावणी करीत त्याने आणखीही अनेकांची फसवणूक केली.

ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कारवाईवाहन विक्रीतही साडे पाच लाखांची फसवणूकआणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्याच्या महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांचा दीर असल्याची बतावणी करत ठाण्यातील एका सराफाला १९ लाखांना गंडा घालणा-या गजानन पालवे (४७, रा. घोडबंदर रोड, ठाणे) या भामट्याला सोमवारी नौपाडा पोलिसांनी पुन्हा अटक केली. कारविक्री प्रकरणात त्याला यापूर्वीच अटक झाली होती. त्याला आता दुस-याही गुन्ह्यात न्यायालयातून ताब्यात घेण्यात आले आहे.गजानन याने मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांचे पती अमित यांचा चुलतभाऊ असल्याची बतावणी करत ठाण्यातील अनेक सराफांना गंडवले. सुरुवातीला त्याने विश्वास बसण्यासाठी आपल्या बोलीप्रमाणे व्यवहारही केले. परंतु, विश्वास संपादन केल्यानंतर त्याने गंडा घालण्यास सुरुवात केली. त्याचा साथीदार अक्षय चौधरी याची तो पंकजा यांचे पती अमितदादा अशी ओळख करून देत होता. अक्षयच्या मदतीनेच त्याने अनेकांना गंडा घातला. ठाण्याच्या पाचपाखाडीतील म्हसे-पाटील यांचीही त्याने दोन कारच्या खरेदीमध्ये पाच लाख ६४ हजारांमध्ये फसवणूक केली. याप्रकरणी तक्रार दाखल होताच २० जून रोजी त्याला पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकाने अटक केली. त्याची १ जुलै रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. दरम्यान, ठाण्याच्या विजय बेंद्रे या सराफाकडूनही त्याने २२ एप्रिल २०१८ रोजी सोन्याची बिस्किटे, नाणी आणि सोनसाखळी असे ५८० ग्रॅम ६४० मिली ग्रॅम वजनाचे १९ लाख ४० हजारांचे दागिने घेतले. त्या बदल्यात त्याने बेंद्रे यांना दिलेले १९ लाख ४० हजारांचे धनादेशही वटले नाही. याच प्रकरणात त्याचा नौपाडा पोलिसांनी सोमवारी न्यायालयातून ताबा घेतला. त्याला आता पुन्हा अटक करण्यात आली असून त्याच्याकडून आणखीही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. उपनिरीक्षक महेश कवळे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे