शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सीडीआरप्रकरणी दिल्लीतून गुप्तहेर पंकज तिवारीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 05:54 IST

बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणी ठाणे पोलिसांनी बुधवारी दिल्लीतील पंकज तिवारी या खासगी गुप्तहेरास अटक केली. तिवारी याच्यावर यापूर्वी केंद्रीय मंत्री अरुण जेटलींचे सीडीआर काढल्याचा आरोप होता.

- राजू ओढे ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणी ठाणे पोलिसांनी बुधवारी दिल्लीतील पंकज तिवारी या खासगी गुप्तहेरास अटक केली. तिवारी याच्यावर यापूर्वी केंद्रीय मंत्री अरुण जेटलींचे सीडीआर काढल्याचा आरोप होता.ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने मोबाइल फोनचे सीडीआर बेकायदेशीरपणे काढणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जानेवारीमध्ये केला होता. या प्रकरणामध्ये देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह १५ आरोपींना अटक केली. गुप्तहेर कीर्तेश कवी याला यापूर्वीच अटक केली होती. त्याच्या मदतीने गुप्तहेर लक्ष्मण ठाकूर याने काही सीडीआर मिळवल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर, ११ मे रोजी त्यालाही अटक करण्यात आली. तिवारी हा या प्रकरणी अटक केलेला अकरावा खासगी गुप्तहेर आहे. त्याच्या अटकेने एकूण आरोपींची संख्या १५ झाली आहे. या आरोपींमध्ये यवतमाळ येथील एका पोलीस शिपायाचाही समावेश आहे.पोलीस कोठडीदरम्यान त्याच्याकडून पोलिसांना दिल्ली येथील खासगी गुप्तहेर पंकज तिवारी याची माहिती मिळाली. लक्ष्मण ठाकूरने पंकज तिवारीकडून काही सीडीआर मिळवल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी दिल्लीतून पंकज तिवारीला अटक केली. गुरुवारी दिल्ली येथील कडकड्डुमा न्यायालयाकडून पोलिसांनी त्याची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट कस्टडी) घेतली. शुक्रवारी ठाण्याच्या न्यायालयासमोर हजर करून त्याची रीतसर पोलीस कोठडी घेतली जाईल.>ठाकूरच्या कोठडीत वाढ११ मे रोजी ठाणे पोलिसांनी अटक केलेला सांताक्रूझ येथील गुप्तहेर लक्ष्मण ठाकूर याची पोलीस कोठडी न्यायालयाने १९ मेपर्यंत वाढवली.

टॅग्स :jailतुरुंग