शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबरमध्ये होणार पंडितराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 19, 2022 17:46 IST

१ आणि २ ऑक्टोबर रोजी ठाण्यात रंगणार स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महाविद्यालयीन विश्वात मानाची असलेली कै. नी. गो. पंडितराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा यंदा १ आणि २ ऑक्टोबर रोजी ठाण्यात होणार आहे. श्री समर्थ सेवक मंडळ, ठाणे यांच्यातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेचे यंदाचे ५४वे वर्ष आहे. ही स्पर्धा कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालये अशा दोन गटांत आयोजित केली जाते. प्रत्येक गटात पाच स्पर्धक पाठविण्याची महाविद्यालयांना संधी आहे.

पदवी गटासाठी नियोजित भाषणाकरता १. शेजारी राष्ट्रांमधील सत्ता संघर्ष आणि भारत, २. मराठी साहित्यातील वसंत बापट यांची मुशाफिरी, ३. स्टार्ट अप - माझ्या नजरेतून मूल्यमापन, ४. अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा - बदलत्या जाणिवांचा, ५. तरुणाई आणि मानसिक स्वास्थ्य असे विषय देण्यात आले आहेत तर, कनिष्ठ गटासाठी, १. शाळेपासून भेटलेल्या शांताबाई शेळके, २. युद्धाच्या ज्वाला, महागाईची झळ, ३. माझ्या नजरेतून अग्निपथ योजना, ४. सप्तसुरांतील सुर हरपला, ५. चित्रपट क्षेत्रावर वेब सिरिजचे बूमरांग हे विषय आहेत. स्पर्धकांना नियोजित भाषणासाठी प्रत्येकी १० मिनिटे, तर आयत्यावेळेच्या विषयासाठी तीन मिनिटांचा वेळ दिला जाईल. स्पर्धकांनी नियोजित आणि उत्स्फूर्त दोन्ही भाषणे करणे अपेक्षित आहे. विजेत्यांना प्रत्येक गटात प्रथम क्रमांकास ६००० रुपये, द्वितीय क्रमांकास ३००० रुपये, तृतीय क्रमांकास २००० रुपये आणि उत्तेजनार्थ १००० रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ २ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता शिव दौलत सभागृह, हनुमान व्यायामशाळा, गडकरी रंगायतनसमोर, ठाणे येथे होईल, अशी माहिती स्पर्धा समितीचे चिटणीस डॉ. चैतन्य साठे यांनी दिली आहे. स्पर्धेविषयी अधिक माहिती, नावनोंदणी, बाहेर गावच्या स्पर्धकांसाठी विनामूल्य निवास व्यवस्था आदी तपशिलासाठी स्पर्धा समितीशी ९९८७९०६२०६ किंवा ९८२१५७२४२७ येथे संपर्क साधावा असे आवाहन समितीचे आणि मंडळाचे अध्यक्ष संजीव हजारे यांनी केले आहे.