शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे झाले, पण मदतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:11 IST

अतिवृष्टीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

डोंबिवली : अतिवृष्टीमुळे निवासी भागातील घरांमध्ये पुराचे पाणी शिरून लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे तहसील कार्यालयाकडून पंचनामे करण्यात आले, पण अद्याप काही पूरग्रस्तांपर्यंत सरकारची मदत पोहोचलेली नाही. मदतीसाठी त्यांचे तहसील कार्यालयात हेलपाटे सुरू असून, राजकीय मंडळींनीही आता याकडे दुर्लक्ष केल्याने मदत मिळणार तरी कधी, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.अतिवृष्टीमुळे एमआयडीसीतील निवासी भागात ३ आणि ४ आॅगस्टला पूरजन्य परिस्थिती ओढावली होती. रहिवाशांच्या घरांत पाणी शिरून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी घरात शिरले होते. दरम्यान, आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस निवासी भागातील मिलापनगर परिसरातील रहिवाशांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन अन्य नागरी समस्यांसह पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा मांडला होता. पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने ही समस्या ओढावल्याचे सांगताना व्यवस्थापनाचे चुकीचे नियोजन याला कारणीभूत असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला होता. परंतु, अद्यापही काही रहिवाशांना नुकसानभरपाई मिळाली नसल्याचे वास्तव आहे. सरकारच्या आदेशानुसार तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे केले होते.काही दिवसांतच मदत मिळेल, असेही त्यावेळी सांगितले होते. पंचनामा प्रक्रिया पूर्ण होऊन महिना उलटला, पण अद्याप मदत काही मिळालेली नाही. विशेष बाब म्हणजे, तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना घेऊन येणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही याकडे लक्ष देत नसून ते आता फोनही उचलत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.तहसील कार्यालयाकडे मदतीसंदर्भात विचारपूस केली असता त्यांच्याकडून ठोस उत्तरे दिली जात नसल्याने रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्यात. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी जी काय मदत असेल ती मिळावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे. यासंदर्भात लोकमतने कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांच्याशीसंपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.>मदत मिळणार कधी?घरामध्ये दोन फुटांपर्यंत पाणी शिरले होते. त्यामुळे घरातील लाकडी सामानांसह कपड्यांचे तसेच अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. आमच्या घरासह तळ मजल्यावर असलेल्या तीन घरांमध्येही पाणी शिरून नुकसान झाले. तहसील कार्यालयाकडून नुकसानीचे पंचनामे झाले, पण आतापर्यंत कोणतीही मदत मिळालेली नाही. कार्यालयाकडूनही स्पष्टपणे काही सांगितले जात नाही, अशी प्रतिक्रिया निवासी भागातील संदेश को-आॅप. हा. सोसायटीत राहणारे विश्वास सावंत यांनी दिली.