शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

पालिका, व्यापारी आले आमनेसामने; अतिक्रमण हटाव, कारवाईला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 00:45 IST

उल्हासनगर : शहरातील पदपथांवरील अतिक्रमण कारवाईवेळी व्यापारी व मनपा कर्मचारी शुक्रवारी आमनेसामने आले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांवर अदखलपात्र ...

उल्हासनगर : शहरातील पदपथांवरील अतिक्रमण कारवाईवेळी व्यापारी व मनपा कर्मचारी शुक्रवारी आमनेसामने आले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून मुजोर व्यापाऱ्यांनी ट्रकमध्ये टाकलेले साहित्य काढून घेतले.मोबाइल, फर्निचर, जपानी व गजानन कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये नागरिकांनी दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला. नेहरू चौक, शिरू चौक, शिवाजी चौक परिसरातील रस्ते, पदपथांवरील फेरीवाल्यांवर अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली.

दरम्यान, मनसेचे सचिन बेंडके यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने फेरीवाल्यांची व्यथा उपायुक्त मदन सोंडे यांच्याकडे मांडून साहित्य विक्री करण्यास परवानगी मागितली. नंतर अतिक्रमण पथकाने मोर्चा शेजारील १७ सेक्शन येथील मोबाइल मार्केटकडे वळविला. फेरीवल्यांचे साहित्य जप्त केले व ट्रकमध्ये टाकले. 

या प्रकाराने व्यापारी व शिंपी, कर्मचारी आमनेसामने आल्याने  तणाव निर्माण झाला. मुजोर व्यापाऱ्यांनी महापालिका अतिक्रमण पथकाने जप्त करून ट्रकमध्ये टाकलेले सामान काढून टाकले. यामुळे शिंपी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेतली. ऐन दिवाळीत  वाद नको म्हणून अनेक नेत्यांनी मध्यस्थी केली. अखेर, तक्रारीनंतर पोलिसांनी व्यापाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हे दाखल केले.

शिस्तीची गरज

ऐन दिवाळीत वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून अतिक्रमणविरोधी विभागाने पदपथावरील अतिक्रमण हटविले. व्यापाऱ्यांनी कारवाईला सहकार्य करायला हवे. अशी अपेक्षा असताना कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून अंगावर धावून जाणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी केला आहे. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे