वाडा : पालघरमधील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणातील ११ आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कैद्यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्याची प्रक्रिया सुरू होती. वाडा पोलिसांनी अटक केलेल्या गडचिंचले हत्याकांड प्रकरणातील १७ आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. यापैकी ११ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. त्यांना न्यायालयाच्या परवानगीने वैद्यकीय उपचारांसाठी दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी सांगितले.
साधू हत्याकांडातील ११ आरोपींना कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 03:03 IST