रुग्ण बरे होण्यात पालघर जिल्हा अव्वल; ९६.८६ टक्के रिकव्हरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 12:51 AM2020-12-13T00:51:41+5:302020-12-13T00:51:50+5:30

ग्रामीण परिसरातील कोरोनाचिंतेचे वातावरण झाले कमी

Palghar district leads in patient recovery; 96.86 percent recovery | रुग्ण बरे होण्यात पालघर जिल्हा अव्वल; ९६.८६ टक्के रिकव्हरी

रुग्ण बरे होण्यात पालघर जिल्हा अव्वल; ९६.८६ टक्के रिकव्हरी

Next

- हितेन नाईक

पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या बरे होण्याच्या टक्केवारीमध्ये पालघर जिल्हा (९६.८६ टक्के) राज्यात सर्व जिल्ह्यांमधून अव्वल स्थानी राहिला आहे. आरोग्य विभागाने १ डिसेंबर रोजी राज्यातील आजारी रुग्णांचा घेतलेल्या आढाव्यात ही बाब समोर आली आहे. पालघरमधील रुग्ण बरे होण्याचा दर राज्यातील ३५ जिल्ह्यांतून अधिक असल्याचे आढळून आले आहे.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १४ हजार ९१८ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी १४ हजार ४६८ रुग्ण बरे झाले आहेत.  जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या १५२  कोरोनाबाधित असून, त्यापैकी डहाणू तालुका २०, जव्हार ६, मोखाडा १, पालघर १०५, तलासरी ६, वसई ग्रामीण १, विक्रमगड २, वाडा ११ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित नागरिकांपैकी १०९ नागरिकांनी घरी विलगीकरण करून घेतले गेले. उर्वरित इतर रुग्ण विक्रमगडमधील रिव्हेरा आणि बोईसरमधील टिमा समर्पित कोरोना केंद्रांमध्ये व इतर रुग्णालयांत दाखल करण्यात आलेले आहेत. 
ग्रामीण भागात २९८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनाचा मृत्युदर (सीएफआरनुसार) २.० टक्के आहे. मृत्युदरांमध्ये वसई ग्रामीण भागातील मृत्युदर ३.६ टक्के असून, वाडा, पालघर, डहाणू, मोखाडा येथील मृत्युदर सरासरीच्या जवळपास आहे. रुग्ण बरे होण्याच्या दरामध्ये जव्हार, विक्रमगड, तलासरी आणि वाडा या तालुक्यांमधील कामगिरी समाधानकारक आहे. 

जिल्ह्यात ४३,५५० नागरिक बाधित 
संपूर्ण पालघर जिल्ह्यात वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रासह ४३ हजार ५५० नागरिकांना कोरोनाबाधा झालेली असून, त्यापैकी १ हजार १७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर या जीवघेण्या आजारावर ४१ हजार ७०६ रुग्णांनी मात केली आहे.  सध्या ६७१ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उभारलेल्या व्यवस्थेने केलेल्या कामाचे हे फलित असून, नागरिकांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक आहे.
- डॉ. माणिक गुरसळ, जिल्हाधिकारी, पालघर

Web Title: Palghar district leads in patient recovery; 96.86 percent recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.