शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

पालघरमध्ये १०८ रुग्णवाहिका ठरली कोरोनाकाळात जीवनवाहिनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:39 IST

४ हजार ४०४ जणांना मिळाले जीवनदान; ११ रुग्णवाहिका धावल्या अविरत

- सुनील घरतपारोळ : पालघर जिल्ह्यात कोरोना संकटकाळात कोरोनायोद्धा म्हणून डॉक्टर, परिचारिका, आशासेविका, पोलीस, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत कर्मचारी आठ महिन्यांपासून कोरोनासोबत लढत आहेत, पण या सर्वांसोबत जीवनवाहिनी ठरली ती १०८ रुग्णवाहिका. तिने आजपर्यंत अविरतपणे सेवा दिली आहे. कोरोना रुग्ण, संशयित यांची ने-आण करण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेची सेवा पालघर जिल्ह्यात उपयुक्त ठरली आहे.जिल्ह्यात कोरोनाच्या काळात ११ रुग्णवाहिका धावल्या असून, त्यांनी ४ हजार ४०४ कोरोना रुग्णांना जीवनदान दिले. या काळात ६४ चालक व ४६ डॉक्टर यांनी आपले कर्तव्य चोख बजावले. कोरोना रुणांना सेवा देत असताना, दोन डॉक्टर व दोन चालक यांनाही कोरोनाची लागण झाली होती. पालघर जिल्हा हा सागरी, डोंगरी व नागरी भागात विभागला असून, वसई, विरार, नालासोपारा, पालघर, बोईसरसारखा शहरी भाग आहे, तसेच विक्रमगड, जव्हार, मोखाडासारख्या दुर्गम भागाचाही समावेश आहे.कोरोनाने पाय पसरल्यापासून रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेतमहाराष्ट्र सरकार आणि भारत विकास समूहाच्या संयुक्त संघटनेतर्फे चालविल्या जाणाऱ्या १०८ रुग्णवाहिका कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांसाठी जीवनवाहिनी म्हणून धावून आल्या आहेत. कोरोना विषाणूने जिल्ह्यात पाय पसरला, तेव्हापासून १०८ रुग्णवाहिका रुग्णांची सेवा करीत आहे.  १० हजारहून अधिक रुग्णांना लाभ जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संकटात '१०८' या आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा तब्बल १० हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला, तर ४ हजार ४०४ जणांचे प्राण वाचले. अगदी मोफत पद्धतीने दिल्या जाणाऱ्या सेवेमुळे वैद्यकीय मदत नागरिकांना वेळेत पोहोचू शकल्याने अनेकांना नवजीवन देण्याचे काम त्यामुळे साध्य झाले आहे.डॉक्टर, कर्मचाऱ्यांना अपुऱ्या सुविधा जिल्ह्यातील कोविड सेंटर वेगवेगळ्या भागात असल्याने कोरोना रुणांना सेंटरपर्यंत ने-आण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असतानाही रुग्णवाहिका सेवा पालघर जिल्ह्यात सरस ठरली आहे.  २०१४ पासून जिल्ह्यात तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी एकूण २९ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. जिल्ह्यात १०८ च्या २९ रुग्णवाहिका असून, ११ रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या. जुलै ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असताना, २४ तास सेवा दिली. आता जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत असल्याने कोरोनासाठी असलेल्या रुग्णवाहिकाही कमी करण्यात येतील.-अमित वडे,  पालघर पर्यवेक्षक